द्वितीय मानांकित महेक जैनने कुमारांच्या बीआयपीएल चषक अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेतील मुलींच्या एकेरीत आपली आगेकूच कायम राखली. तिने काव्या बालसुब्रमण्यम्ला ६-२, ६-२ असे पराभूत केले.
शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत महेकने दोन्ही सेट्समध्ये प्रत्येकी एकदा सव्र्हिसब्रेक मिळवला. तिने जमिनीलगत परतीचे सुरेख फटके मारले तसेच नेटजवळून प्लेसिंगचा सुरेख खेळ कला. अन्य लढतीत शिवानी अमिनेनी हिने स्लोवाकियाच्या निका झुपांकिक हिच्यावर ६-१, ७-५ अशी मात केली. आकांक्षा भान हिने हुमेरा शेख हिचे आव्हान ७-६ (८-६), ६-३ असे संपुष्टात आणले. नेदरलँड्सच्या इव्हा व्हेडेर हिने सराह मेनेझिझ हिचा ६-१, ६-१ असा दणदणीत पराभव केला. इव्हा हिने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा उपयोग करीत दोन्ही सेट्समध्ये प्रत्येकी दोन वेळा सव्र्हिसब्रेक नोंदविला.
मुलांमध्ये बी.उदयन याने तिसऱ्या मानांकित वोराचोन राकपुआंगचोन याच्यावर सनसनाटी विजय मिळविला. क्रॉसकोर्ट फटके व बिनतोड सव्र्हिस असा चतुरस्र खेळ करीत त्याने हा सामना ६-३, ६-२ असा जिंकला. आदित्य वसिष्ठ याने अनिरुद्ध चंद्रशेखर याचा ४-६, ६-३, ६-४ असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर त्याने सव्र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवीत विजय मिळविला.
महेकचे आव्हान कायम
पहिला सेट गमावल्यानंतर त्याने सव्र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवीत विजय मिळविला.
Written by रत्नाकर पवार
First published on: 02-12-2015 at 02:42 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Game of mehek jain