गणेश पवार (क्रीडा प्रबोधिनी) व अर्जुन पाटील (सांगली) यांनी महापौर चषक पुणे ते जेजुरी राज्यस्तरीय सायकल शर्यतीत अनुक्रमे रेसिंग सायकल व भारतीय बनावटीची सायकल या विभागात प्रथम क्रमांक मिळविला.
पवारने ५० किमी अंतराची ही शर्यत ५५ मिनिटे २८.४४ सेकंदात पार केली. किशोर जाधव (क्रीडा प्रबोधिनी), रवींद्र कारंडे (मुंबई), सोहिल कारगीर, दिलीप माने, शाहीद जमाद (सांगली) यांनी अनुक्रमे दोन ते सहा क्रमांक मिळविले. सोहिल ‘घाटाचा राजा’ ठरला.
भारतीय सायकल विभागात अर्जुन पाटीलने घाटाचा राजा किताबासह ही शर्यत ५६ मिनिटे ८.३४ सेकंदात पार केली. त्याचेच सहकारी हुसेन कुरबू, रमेश मंडले, प्रदीप शिंगटे, राम जाधव आणि डेसमंड मिरांडा यांनी अनुक्रमे दोन ते सहा क्रमांक पटकाविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा