भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया हे असे एकच प्रशासक होते की त्यांचे क्रिकेट विश्वामध्ये सारेच मित्र होते, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचा (कॅब) नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुलीने दालमिया यांच्या शोकसभेमध्ये दिली.
२० सप्टेंबरला दालमिया यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. १९७७ सालापासून दालमिया हे क्रिकेटमध्ये प्रशासक म्हणून कार्यरत होते.
‘‘जेव्हा मी जगभरात जायचो तेव्हा सारेच त्यांच्याविषयी विचारपूस करायचे आणि मला दालमिया यांना त्यांचा संदेश पोचवायला सांगायचे. विश्वाच्या प्रत्येक ठिकाणी त्यांचे मित्र, शुभचिंतक भेटायचे. दालमिया हे प्रत्येक वेळी अध्यक्ष नसायचे. पण न्यूझीलंड असो किंवा इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, पाकिस्तान कुठेही मी गेलो तर भेटलेल्या व्यक्ती आपला नमस्कार त्यांच्यापर्यंत पोहोचवायला सांगायचे,’’ असे गांगुली दालमिया यांच्या शोकसभेत बोलत होता.
दालमिया यांची शोकसभा इडन गार्डन्सवर घेण्यात आली होती. या वेळी भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, बीसीसीआयचे संयुक्त सचिव अमिताभ चौधरी, कॅबचे अधिकारी, वरिष्ठ सदस्य आणि दालमिया यांचे कुटुंबीय या वेळी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 1st Oct 2015 रोजी प्रकाशित
दालमियांचे सारेच मित्र होते -गांगुली
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया हे असे एकच प्रशासक होते की त्यांचे क्रिकेट विश्वामध्ये सारेच मित्र होते
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 01-10-2015 at 01:45 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganguly says jagmohan dalamiyance was the greatest sport administrator