झिम्बाब्वेचा खेळाडू गॅरी बॅलेन्सने वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावत इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये दोन देशांसाठी शतक झळकावणारा तो जगातील दुसरा खेळाडू आहे. झिम्बाब्वेकडून गॅरी बॅलेन्सने बुलावायोमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावले. त्याने यापूर्वी इंग्लंड संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळले असून कसोटी क्रिकेटमध्येही त्याने अनेक शतके झळकावली आहेत.
गॅरी बॅलन्सपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या केप्लर वेसेल्सने हा करिष्मा केला होता. दक्षिण आफ्रिकेशिवाय केपलर वेसेल्सनेही ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले होते. वेसल्सने ऑस्ट्रेलियासाठी ४ आणि दक्षिण आफ्रिकेसाठी २ कसोटी शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर गॅरी बॅलन्सने इंग्लंडसाठी ४ शतके आणि आता झिम्बाब्वेसाठी पदार्पणाच्या सामन्यात पहिले शतक झळकावले आहे. त्याने आणखी दोन शतके झळकावल्यावर तो इतिहास रचेल.
वेस्ट इंडिजविरुद्ध गॅरी बॅलन्सने झिम्बाब्वे संघासाठीचा फॉलोऑन तर टाळलाच, पण शतकासह संघाला सुस्थितीत आणले. त्याने २३१ चेंडूचा सामना करताना १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १३७ धावा केल्या. मात्र, चार दिवसांचा खेळ संपत आल्याने या सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. पाहुण्या संघ वेस्ट इंडिजकडे निश्चितपणे ८९ धावांची आघाडी आहे, पण कॅरेबियन संघ डाव लवकर घोषित करण्याच्या मनस्थितीत नसेल.
हेही वाचा – पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय; आफ्रिदीवर घातली दोन वर्षांची बंदी
जर वेस्ट इंडिज संघाने सामन्याच्या पाचव्या दिवशी किमान ४५-५० षटके खेळून डाव घोषित केला आणि झिम्बाब्वेसमोर लक्ष्याचा पाठलाग केला तर सामन्याचा निकालही समोर येऊ शकतो. या स्थितीत झिम्बाब्वे संघ धावा करण्याचा प्रयत्न करेल. अशा स्थितीत विकेट पडण्याची शक्यता असेल. तसेच, अनेक जर-तर होण्याच्या शक्यता अत्यंत कमी आहेत.