Gary Kirsten Resigned as Pakistan White Ball Coach: वर्ल्डकप विजेते प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी पाकिस्तानच्या वनडे आणि टी-२० संघांच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. एप्रिल २०२४ मध्ये पीसीबीने दोन वर्षांच्या करारावर नियुक्त केलेल्या कर्स्टन यांनी अवघ्या ६ महिन्यातच पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राजीनामा दिला आहे.

गॅरी कर्स्टन यांनी का दिला पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा?

ESPNcricinfo च्या वृत्तानुसार या निर्णयाची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे. पाकिस्तानचे नवनियुक्त प्रशिक्षक कर्स्टन आणि जेसन गिलेस्पी आणि पीसीबी यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. बोर्डाने त्यांच्या संघनिवडीचे अधिकार हिसकावून घेण्याचा निर्णय घेतल्यापासूनच मतभेद निर्माण झाले होते. गिलेस्पीने इंग्लंडविरुद्धच्या रावळपिंडीतील तिसऱ्या कसोटीत याबद्दल वक्तव्य केले होते, ते म्हणाले आता मी फक्त सामन्याच्या वेळेस विश्लेषक म्हणून आहे.

IND vs NZ AB de Villiers statement on Virat Kohli and Team India
IND vs NZ : ‘आता तो काळ गेला…’, लाजिरवाण्या पराभवानंतर विराटसह टीम इंडियाबद्दल एबी डिव्हिलियर्सचे मोठे वक्तव्य
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mohammad Rizwan says I want to be the captain of the team not the king
Mohammad Rizwan : ‘मला किंग नव्हे तर…’, पाकिस्तान संघाचा कर्णधार होताच मोहम्मद रिझवानचे मोठे वक्तव्य, रोख नेमका कोणाकडे?
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा – IND vs NZ: भारताने कसोटी मालिका गमावल्यानंतर BCCIने काढलं फर्मान, प्रत्येक खेळाडूने मुंबईतील सामन्यापूर्वी…

संघ आणि नवीन मर्यादित षटकांच्या कर्णधाराची घोषणा करण्यात उशीर होण्याचे एक कारण म्हणजे बोर्डामध्ये सुरू असलेली चर्चा, कर्स्टन यांच्यामते बोर्डाने त्यांच्या निर्णयावर फेरविचार करावा असे होते. पत्रकार परिषदेत नवा कर्णधार मोहम्मद रिझवानची घोषणा करण्यात आली. त्या पत्रकार परिषदेत फक्त पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्यासह नवीन निवड समिती सदस्य आकिब जावेद आणि नवा कर्णधार आणि उपकर्णधार सलमान आगा उपस्थित होते. त्यावेळी गॅरी कर्स्टन पाकिस्तानातही नव्हते, असे इएसपीएनक्रिकइन्फोने वृत्तात म्हटले आहे.

हेही वाचा – Emerging Asia Cup: नवा आशिया चॅम्पियन! अफगाणिस्तानने भारतानंतर श्रीलंकेला दणका देत घडवला इतिहास, विजयाचं केलं भन्नाट सेलिब्रेशन; VIDEO

सध्याच्या निवड समितीच्या वाढत्या प्रभावामुळे प्रशिक्षकांना बाजूला सारले गेले. पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी गमावल्यानंतर, तीन महिन्यांतील तिसऱ्या नवीन निवड समितीची घोषणा करण्यात आली. ज्यात आकिब, अलीम दार, अझहर अली, असद शफीक आणि हसन चीमा होते, तर प्रशिक्षक आणि कर्णधार यांना बाजूला करण्यात आले होते.

गॅरी कर्स्टन हे तेच प्रशिक्षक आहेत ज्यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात टीम इंडियाने २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. याशिवाय गॅरी कर्स्टनने IPL 2024 मध्ये गुजरात टायटन्स संघाच्या प्रशिक्षकाची भूमिकाही बजावली आहे. या वर्षी मे महिन्यात त्यांनी पाकिस्तान संघाच्या वनडे आणि टी-२० संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारले. त्यांनी आपल्या कार्यकाळाची सुरुवात इंग्लंडविरूद्ध खेळलेल्या टी-२० मालिकेने केली.

Story img Loader