Praggnanandhaa as he continues to win laurels in world of chess and make India proud : भारतीय बुद्धिबळातील प्रतिभावान आर प्रज्ञानंद यांना अनुभवी उद्योगपती गौतम अदानीमध्ये एक नवीन प्रशंसक सापडला आहे, ज्याने गुरुवारी १८ वर्षीय ग्रँडमास्टरला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. गौतम अदानी यांनी ‘एक्स’ वर प्रज्ञानंदबरोबरच्या त्यांच्या भेटीचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी चेन्नईच्या या स्टार खेळाडूला भारतातील असंख्य तरुणांसाठी प्रेरणास्थान म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गौतम अदानी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करताना लिहिले की, “प्रज्ञानंदला पाठिंबा देणे हा एक सौभाग्य आहे, तो बुद्धिबळाच्या जगात सातत्याने झेंडा फडकवत आहेत आणि भारताची मान उंचावत आहे. त्याचे यश हे असंख्य तरुण भारतीयांना विश्वास ठेवण्याची प्रेरणा आहे की व्यासपीठावर उभे राहून देशाची महानता साजरी करण्यापेक्षा समाधानकारक दुसरे काहीही नाही. प्रज्ञानंद भारत काय करू शकतो आणि काय होईल याचे प्रतिनिधित्व करत आहेत. मी त्याला शुभेच्छा देतो.”

प्रज्ञानंद म्हणाला, “माझा देश जागतिक स्तरावर चांगली कामगिरी करेल याची खात्री करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. जेव्हा मी खेळतो तेव्हा देशाचा अधिकाधिक सन्मान वाढवणे, हेच माझे ध्येय असते. मला माझ्या क्षमतेवर विश्वास आहे. माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवल्याबद्दल मी अदानी समूहाचे आभार मानू इच्छितो.”

हेही वाचा – ICC Test Rankings : केपटाऊनमधील ऐतिहासिक विजयानंतरही भारताची क्रमवारीत घसरण, ऑस्ट्रेलियाने पटकावले अव्वल स्थान

पाचवा सर्वात तरुण ग्रँडमास्टर प्रज्ञानंद –

प्रज्ञानंद हा पाचवा सर्वात तरुण ग्रँडमास्टर आहे. २०१८ मध्ये वयाच्या १२ व्या वर्षी त्याने ही रँक मिळवली होती. २०१९ मध्ये, त्याने डेन्मार्कमध्ये एक्स्ट्राकॉन चेस ओपन जिंकले आणि त्याच वर्षी जागतिक युवा चॅम्पियनशिपमध्ये १८ वर्षाखालील गटाचे विजेतेपद जिंकले. प्रज्ञानंदने डिसेंबर २०१९ मध्ये १४ वर्षे, तीन महिने आणि २४ दिवसांचा असताना २,६०० चे ELO रेटिंग प्राप्त केले. यासह ही कामगिरी करणारा तो दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला.

प्रज्ञानंदने २०२२ मध्ये विश्वविजेता मॅग्नस कार्लसनचा पराभव केला होता. यामुळे महान विश्वनाथन आनंद आणि पी हरिकृष्णानंतर असे करणारा तो तिसरा भारतीय ठरला. त्याने या वर्षात चार वेळा कार्लसनचा पराभव केला होता. २०२३ मध्ये बाकू येथे झालेल्या बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत त्याने कार्लसननंतर उपविजेतेपद मिळविले. यामध्ये अंतिम फेरी गाठणारा तो सर्वात तरुण खेळाडू आणि आनंदनंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपदावर राहून त्यानी कॅंडिडेट्स टूर्नामेंटमध्ये स्थान मिळवले, जे या वर्षी एप्रिलमध्ये टोरंटो, कॅनडा येथे होणार आहे. यामुळे चीनच्या विश्वविजेत्या डिंग लिरेनचे आव्हान निश्चित होईल.

हेही वाचा – सिडनीच्या खराब ‘आउटफिल्ड’वर पाकिस्तानचा खेळाडू दुखापत होण्यापासून थोडक्यात बचावला, VIDEO होतोय व्हायरल

अदानी समूहाने २८ प्रतिभावान खेळाडूंना दिला पाठिंबा –

अदानी समूहाने आपल्या प्रमुख #GarvHai उपक्रमाद्वारे बॉक्सिंग, कुस्ती, टेनिस, भालाफेक, नेमबाजी, धावणे, शॉट पुट, स्पीड वॉकिंग आणि तिरंदाजी या खेळांमधील २८ प्रतिभावान खेळाडूंना पाठिंबा दिला आहे. लाभार्थ्यांमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते कुस्तीपटू रवी कुमार दहिया, दीपक पुनिया आणि बॉक्सर अमित पंघाल यांचा समावेश आहे. दहिया आणि पुनिया यांनी २०२० टोकियो ऑलिम्पिक आणि २०२० आणि २०२३ आशियाई खेळांमध्ये रौप्य पदके जिंकली आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautam adani says its a privilege to support praggnanandhaa as he continues to win laurels in world of chess and make india proud vbm
Show comments