Manoj Tiwary criticizes Gautam Gambhir : माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारीने पुन्हा एकदा टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर निशाणा साधला आहे. अलीकडेच मनोज तिवारीने गंभीरला ‘ढोंगी’ म्हटले होते. त्यानंतर हर्षित राणा आणि नितीश राणा मुख्य प्रशिक्षकाच्या समर्थनार्थ समोर आले होते. आता मनोज तिवारीने पुन्हा एकदा गंभीरवर टीका केली आहे. तो म्हणाला, गंभीरने त्याच्या कुटुंबालाही शिवीगाळ केली होती. इतकेच नाही तो गंभीरने सौरव गांगुलीबद्दल वाईट बोलल्याचे तिवारी म्हणाला.

आकाश दीपने काय चूक केली?

हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना तिवारी म्हणाले, ‘नितीश राणा आणि हर्षित राणा गौतम गंभीरला पाठिंबा का देणार नाहीत? आकाश दीपच्या जागी हर्षित राणाला पर्थमध्ये स्थान मिळाले. हे कसे शक्य झाले? आकाश दीपने काय चूक केली? बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध त्याने शानदार गोलंदाजी केली होती. वेगवान गोलंदाज म्हणून तुम्ही अनुकूल परिस्थितीत गोलंदाजी करण्याचे स्वप्न पाहता, परंतु तुम्ही त्याला वगळले आणि प्रथम श्रेणीचा फारसा अनुभव नसलेल्या हर्षितचा समावेश केला. आकाश दीपचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. ही पूर्णपणे पक्षपाती निवड आहे. त्यामुळेच हे खेळाडू पुढे येऊन त्याचे बचाव करतील.

‘मी काही चुकीचं बोललो नाही…’ –

तो पुढे म्हणाला, “मी काहीही चुकीचं बोललो नाही. मी ज्याबद्दल बोलतोय ते पीआर आहे. यापूर्वी असे कधीच घडलं नव्हतं. जेव्हा कोणी काहीतरी वस्तुस्थितीवर आधारित बोलतो, तेव्हा लोक त्या व्यक्तीचा बचाव करण्यासाठी पुढे येतात, परंतु ते मला ओळखत नाहीत. मी फक्त वस्तुस्थितीच्या आधारावर बोलतो. पीआर पूर्णपणे स्पष्ट आहे.” तिवारीने गंभीरसोबतच्या त्याच्या नात्याची काही जुनी गुपितेही उघड केली. तो म्हणाला की, गंभीरने माझी कुटुंबाला शिवीगाळ केली होती आणि सौरव गांगुलीबद्दल वाईट बोलला होता.

हेही वाचा – Champions Trophy 2025 : ‘अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाका…’, दक्षिण आफ्रिकेच्या क्रीडामंत्र्यांची मागणी

गंभीरच्या तोंडून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द सर्वांनी ऐकला –

मनोज तिवारी पुढे म्हणाला, ‘दिल्लीतील रणजी ट्रॉफी सामन्यादरम्यान गौतम गंभीरच्या तोंडून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द सर्वांनी ऐकला. मग तो सौरव गांगुलीबद्दल वाईट बोललेला असो किंवा माझ्या कुटुंबाला शिव्या दिलेल्या असो. त्याला काही लोकांनी वाचवले होते. मी ज्या पीआरबद्दल बोलत आहे तो हा आहे. खेळाडूंची निवड करून त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडण्याची प्रक्रिया योग्य पद्धतीने होत नाही. हर्षित राणासाठी आकाश दीपला वगळले. जर तुम्हाला वाटतं होतं हर्षित इतका चांगला आहे, तर तुम्ही त्याला उर्वरित मालिकेत का नाही खेळवलं?’

हेही वाचा – R Ashwin : ‘हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही…’, रविचंद्रन अश्विनच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, VIDEO होतोय व्हायरल

संघ निवडीवर व्यक्त केली शंका –

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये गंभीरच्या निर्णयांबाबत तिवारी साशंक आहे. हर्षित राणा आणि देवदत्त पडिक्कल या खेळाडूंच्या निवडीवर त्यानी प्रश्न उपस्थित केला. तो म्हणाला, ‘देवदत्त पडिक्कलचा कसोटी संघात समावेश कसा झाला, तो समीकरणाच्या बाहेर होता. सतत इतक्या धावा करणाऱ्या अभिमन्यू ईश्वरनऐवजी तो संघात कसा आला? त्याने इतक्या धावा केल्या आहेत. त्याची निवड का झाली नाही? असे प्रकार घडत असून त्याचे परिणाम सर्वांसमोर आहेत.

Story img Loader