Gautam Gambhir Files Defamation Case: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार गौतम गंभीरने पंजाब केसरी या हिंदी वृत्तपत्रावर खटला दाखल केला आहे. या क्रिकेटपटूने दिल्ली उच्च न्यायालयात २ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईसाठी मानहानीचा खटला दाखल केला आहे. पंजाब केसरीचे संपादक आदित्य चोप्रा आणि वार्ताहर अमित कुमार आणि इम्रान खान या तिघांवरही गंभीरने त्यांच्या पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचा गैरवापर केल्याबद्दल आणि क्रिकेटपटूला लक्ष्य करणारे असंख्य बनावट आणि बदनामीकारक लेख प्रकाशित केल्याबद्दल खटला दाखल केला आहे.
वकील जय अनंत देहादराय यांच्यामार्फत दाखल केलेल्या खटल्यात गंभीरने अनेक अहवालांचा हवाला दिला आणि दावा केला की हिंदी दैनिकाने आपल्या विषयी बातम्या देताना विषय फिरवले आहेत दिली. ‘बार अँड बेंच’च्या अहवालानुसार, वृत्तपत्रातील एका अहवालात गंभीरची तुलना पौराणिक राक्षस ‘भस्मासुर’शी करण्यात आली होती.
खटल्यात नमूद केलेले काही अहवाल पुढीलप्रमाणे आहेत.
“खासदार गौतम गंभीर बेपत्ता, रस्त्यावर बॅनर झळकले”
“लखनौ सुपर जायंट्ससाठी दिल्लीचा बेपत्ता खासदार बनला भस्मासुर”
“आदेश गुप्ता बोलत राहिला, गौतम गंभीर निघून गेला”
” हे एका नव्या प्रकारचे खासदार आहेत, कृपया त्यांना भेटताना अंतर ठेवा”
खटल्यानुसार, अहवालात गंभीर हा जातीयवादी आणि धूर्त राजकारणी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
गंभीरने २ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे जी धर्मादाय संस्थांना दिली जाईल. लखनऊ सुपर जायंट्सच्या मार्गदर्शकाने असे सांगितले आहे की, “त्याची ‘विना अट’ माफी मागावी जी पंजाब केसरीने प्रसारित केलेल्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये (डिजिटल आवृत्त्यांसह) प्रकाशित केली जावी. त्याच्या विरोधात केलेले प्रत्येक बदनामीकारक प्रकाशन मागे घेण्याचे निर्देश पेपरला जारी केले जावेत.” बुधवारी, १७ मे रोजी न्यायमूर्ती चंद्र धारी सिंह यांच्यासमोर या दाव्याची सुनावणी होणार आहे.
हे ही वाचा<< विराट कोहली, गौतम गंभीर व नवीन उल हकच्या तुफान भांडणाचा Video व्हायरल; IPL ने तिघांना दिली मोठी शिक्षा
दुसरीकडे आयपीएलमध्ये सध्या लखनऊ जाएंट्सची बाजू तगडी सिद्ध होत आहे. बंगळुरूने हरवल्यानंतर, गंभीर- कोहली- नवीन उल हक वाद चिघळला होता. काल मुंबईच्या विरुद्ध सामन्याच्या वेळीही सोशल मीडिया वादावरून अनेक मीम्स व्हायरल झाले होते. कालच्या सामन्यात अवघ्या ८ धावांच्या फरकाने गंभीरचा संघ विजयी ठरला होता.