भारतीय संघाची कसोटी कामगिरी आणि ड्रेसिंग रूममधील वातावरण हा सध्या चर्चेचा विषय आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) भारताच्या कसोटी संघाशी संबंधित समस्यांचे निराकरण करत आहे. पण यादरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांच्यात वाद झाल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी सांगितले की, बीसीसीआयला एका सराव सत्रादरम्यान घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार मॉर्केल या आधीच्या दौऱ्यावर वैयक्तिक कारणामुळे सरावासाठी थोडा उशीरा पोहोचला होता. “गंभीर शिस्तीबाबत अतिशय कडक आहे. त्याने मैदानावरच लगेच मॉर्केलला फटकारले. उर्वरित दौऱ्यात मॉर्केल राखीव होता, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. संघाचे कार्य सुरळीतपणे पार पाडणं हे या दोघांवर अवलंबून आहे”, असे बीसीसीआयच्या सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.

हेही वाचा – भारतीय खेळाडू ‘काफिर’; पाकिस्तानी खेळाडूची टीम इंडियावर आगपाखड, भारताच्या माजी खेळाडूने सांगितला ‘तो’ प्रसंग

बीसीसीआय सपोर्ट स्टाफच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि वरिष्ठ खेळाडूंकडून त्यांच्या योगदानाबद्दल माहिती घेत आहे, अशीही माहिती समोर आली आहे. दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनीही विराट कोहली वारंवार सारख्याच पद्धतीने बाद झाल्यानंतर फलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

हेही वाचा – India Next Captain: ऋषभ पंत नाही २३ वर्षीय युवा खेळाडू भारताचा भावी कर्णधार? कोचने केली निवड; गंभीर-आगरकरमध्ये मतभेद

फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जात आहे. गंभीर स्वतः एक कुशल फलंदाज आहे. बोर्डाने नायर यांच्या प्रशिक्षणाबाबत खेळाडूंशी चर्चा केली त्याचप्रमाणे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांच्या भूमिकेची चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय अनुभव नसणं आणि त्यांच्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची कामगिरी उंचावण्यास हातभार लावण्याची क्षमता यावर प्रश्न उपस्थित केले आहेत, अशी माहितीही सूत्रांनी दिली. सपोर्ट स्टाफचा करार दोन-तीन वर्षांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा विचार बोर्ड करत आहे.

हेही वाचा – Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहने पटकावला ICC चा खास पुरस्कार, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पाहिला गोलंदाज

ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान भारताने मेलबर्न कसोटी गमावल्यानंतर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये कोच गंभीरने सर्वांना फैलावर घेतल्याची बातमी समोर आली होती. गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या खेळाडूंसमोर ‘आता खूप झालं’ या शब्दांत आपला संताप व्यक्त केला. गंभीरनं यावेळी कोणत्याही खेळाडूचं नाव घेतलं नाही. पण त्याच्या बोलण्याचा पूर्ण रोख हा काही खेळाडू कशाप्रकारे परिस्थितीनुसार खेळण्याऐवजी ‘नैसर्गिक खेळा’च्या नावाखाली हवं तसं खेळत होते, असाच होता. पण नंतर गंभीरने पाचव्या कसोटीपूर्वी पत्रकार परिषदेत ड्रेसिंग रूममधील ही चर्चा तथ्यहीन असल्याचं म्हटलं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautam gambhir angry on morne morkel in australia for turning up late at training ind vs aus bdg