Gautam Gambhir Backs KL Rahul Ahead Border Gavaskar Trophy: केएल राहुलचा सध्या खूपच खराब फॉर्मामधून जात आहे. राहुल भारतीय संघानंतर ऑस्ट्रेलियातील भारत अ संघाच्या दुसऱ्या अनधिकृत कसोटीतही तो फ्लॉप ठरला. याच कारणामुळे त्याच्यावर सातत्याने टीका होत असून त्याला संघातून वगळण्याची मागणीही केली जात आहे. २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे होणाऱ्या सामन्यातून राहुल प्लेईंग इलेव्हनचा भाग नसेल, असे मानले जात आहे. मात्र, आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी राहुलचे समर्थन करत त्याच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे.
दुखापतीतून परतल्यानंतर केएल राहुलने साधारण कामगिरी केली आहे. जेव्हा जेव्हा टीम इंडियाला कठीण परिस्थितीत त्याची गरज भासली तेव्हा तो फ्लॉप ठरला आहे. गेल्या ७ डावांमध्ये राहुलच्या बॅटमधून फक्त एक अर्धशतक पाहायला मिळाले आहे, त्यापैकी दोन डाव भारत अ संघाकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळले आहेत. तर त्याच्या तुलनेत इतर स्पर्धकांची कामगिरी चांगली आहे, ज्यात सर्फराध खान आणि ध्रुव जुरेल सारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
हेही वाचा – भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल पर्थ कसोटीत सलामीला उतरणार?
भारतीय संघाची दुसरी तुकडी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याआधी गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत केएल राहुलबाबत सांगितले की, त्याच्यासारखे खेळाडू फक्त काही देशांमध्ये आहेत. गंभीर म्हणाला, “केएल राहुल टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करू शकतो, तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, तो सहाव्या क्रमांकावर खेळू शकतो. त्यामुळे या सर्व गोष्टी पार पाडण्यासाठी खूप प्रतिभा असावी लागते आणि याचबरोबर तो एकदिवसीय सामन्यांमध्ये यष्टीरक्षणदेखील करू शकतो. किती देशांमध्ये केएलसारखे खेळाडू आहेत, याचा विचार करा.”
“जर कर्णधार रोहित शर्मा पर्थमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटीसाठी उपलब्ध नसेल तर राहुल त्याच्या जागी सलामीसाठी पर्याय आहे”, असंही गौतम गंभीर म्हणाला. अलीकडेच राहुलने ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धही डावाची सुरुवात केली होती, पण दोन्ही डावांत तो केवळ १४ धावाच करू शकला. राहुलला ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव असला तरी त्यामुळे त्याला पर्थमध्ये संधी मिळेल, असे ठामपणे सांगता येत नाही.
© IE Online Media Services (P) Ltd