Gautam Gambhir Shayari and Bhangra Video: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून भारताने विक्रमी तिसऱ्यांदा या आयसीसी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या विजयानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. जगभरातील भारतीय चाहत्यांनी डान्स करत एकच आनंद साजरा केला. यादरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताच्या विजयानंतर टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंशी चर्चा करण्यात आली, त्यांची मुलाखतही झाली. अखेरीस भारताचा कोच गौतम गंभीरदेखील मुलाखतीसाठी हजर होता. या व्हिडिओमध्ये गंभीरने सिद्धूच्या सांगण्यावर भांगडा केला. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडने दिलेले २५२ धावांचे लक्ष्य ४९ षटकांत चार विकेट गमावून पूर्ण केले.

अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये गंभीर सिद्धूला म्हणतो- माझा विषय सोडा. तुमचा एक खास शेर ऐकवा, नाहीतर मी शेर सांगतो. मी तुमचा तो शेर बोलू. यावर सिद्धू म्हणतो, ‘हो हो बोल बघू, माझे सगळे शेर संपलेत आज.

यावर गंभीर म्हणाला, ”फन कुचलने का हुनर सीखिये जनाब।’, तितक्यात सिद्धू म्हणतात ‘अरे व्वा!’ आणि शेर पूर्ण करतात. ‘सांपों के डर से जंगल नहीं छोड़े जाते।’ तितक्यात सिद्धू म्हणतात, आज तू अजून एक ऐतिहासिक गोष्ट कर. माझी विनंती आहे की तू आज माझ्याबरोबर भांगडा करा. यानंतर सिद्धूने गंभीरचा हात धरला आणि नंतर ‘सौदा खरा खरा’ गातो आणि भांगडा करतो. आधी गंभीर नाही नाही म्हणतो आणि मागे जातो.

पण शेवटी गंभीरही हात वर करून भांगडा करण्याचा प्रयत्न करतो. यावर सुरेश रैना म्हणतो, “गौतम भाई खूप हट्टी आहे.” व्हिडिओमध्ये आकाश चोप्राही सिद्धू आणि गंभीरसह भांगडा करतो. यानंतर सिद्धूने हार्दिक पांड्याबरोबरही भांगडा केला. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.

नवज्योत सिंग सिद्धू गोलंदाजांविषयी प्रश्न विचारताना म्हणतात, “गंभीर, आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर असताना तू सहा गोलंदाजांचा पर्याय ठेवला होतास. जे विजयाचे कारण ठरले. २०२३ च्या विश्वचषक फायनलमध्येही कोहली अनेकदा गोलंदाजी करताना दिसला होता. सहा-सात गोलंदाजांच्या या पर्यायाने भारतीय क्रिकेटचा दृष्टिकोन बदलला आहे का?”

यावर उत्तर देताना गंभीर म्हणाला, “गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपासून याची सुरुवात झाली. ती मालिका आम्ही गमावली. रियान पराग तिथे आमचा सहावा गोलंदाज होता. त्याआधी आमच्याकडे फक्त पाच गोलंदाज होते. आत पाच क्षेत्ररक्षक आणि दोन नवीन चेंडू. केवळ पाच गोलंदाजांसह उतरल्यास गोलंदाजीवर खूप दडपण येते. पहिल्या दिवसापासून मला असं वाटत होतं की आमच्याकडे गोलंदाजीचे सहा पर्याय असावेत. फलंदाजीबाबत तडजोड करावी लागली तरी त्यात काहीच हरकत नाही, कारण फलंदाज तुम्हाला सामने जिंकून देतात आणि गोलंदाज स्पर्धा जिंकून देतात.”