Team India Head Coach Gautam Gambhir Press Conference : भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आता मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी या प्रकरणावर मौन सोडले आणि कोणती नावे निश्चित केली जाऊ शकतात हे सांगितले. गौतम गंभीर २७ जुलैपासून श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेपासून भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ सुरू करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अद्याप सपोर्ट स्टाफबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.
राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्याने सपोर्ट स्टाफचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे. बीसीसीआयने प्रशिक्षक म्हणून गंभीरच्या नावाची घोषणा केली होती, मात्र सपोर्ट स्टाफबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत अभिषेक नायर आणि रायन टेन डेस्काटे यांची नावे चर्चेत आहेत, तर गोलंदाजी प्रशिक्षकाबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही.
टी. दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून आपला कार्यभार चालू ठेवू शकतात, असे मानले जात आहे. दिलीप यांचा कार्यकाळ यशस्वी होता आणि त्यांनी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये सकारात्मक प्रभाव टाकला आहे. याशिवाय राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) साईराज बहुतुले अंतरिम गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून श्रीलंका दौऱ्यावर जाऊ शकतात.
हेही वाचा – MS Dhoni : तुषार देशपांडेने धोनीला गुरुपौर्णिमेच्या दिल्या खास शुभेच्छा, इन्स्टावर वडिलांसह शेअर केला फोटो
‘श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर चित्र स्पष्ट होईल’ –
निवडसमितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्याबरोबर झालेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीर म्हणाला, “मी खूप आनंदी आहे. कारण बीसीसीआयने मी मागणी केलेल्या अनेक मुद्द्यांवर सहमती दर्शवली आहे. सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अभिषेक आणि डुश्काटा यांच्या नावांची चर्चा होत असल्याचे मी ऐकले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर तुम्हाला सपोर्ट स्टाफबद्दल स्पष्ट माहिती मिळेल. अभिषेक, साईराज आणि दिलीप इथे आहेत आणि डेस्काटे कोलंबोमध्ये आमच्याबरोबर जोडले जातील.”
हेही वाचा – Ajit Agarkar : ‘आमचे काम फक्त…’, ऋतुराज-अभिषेकला संघातून वगळण्यावर अजित आगरकरांनी दिले स्पष्टीकरण
अभिषेक आणि डुश्काटा यांचा प्रवास कसा राहिला?
अभिषेक नायरने भारतासाठी तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने प्रथम श्रेणी कारकिर्दीत मुंबईला अनेक रणजी ट्रॉफी विजेतेपद मिळवून दिले आहे. दिनेश कार्तिकसारख्या खेळाडूचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नायरचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी त्रिनबागो नाइट रायडर्सला कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये यश मिळवून दिले. दुसरीकडे, रायन टेन डेस्काटे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे. तो सध्या अमेरिकेतील मेजर क्रिकेट लीगमध्ये लॉस एंजेलिस नाइट रायडर्सचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत.