Gautam Gambhir On Ravi Shastri : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या वनडे वर्ल्डकपच्या रणनितीचा चांगलाच समचार घेतला आहे. वनडे वर्ल्डकपसाठी तीन डावखुऱ्या फलंदाजांची आवश्यकता असल्याचं शास्त्री यांनी म्हटलं होतं. परंतु, गंभीरने शास्त्री यांच्या वर्ल्डकपच्या रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तीन डावखुऱ्या फलंदाजांमुळे संघाता काहीही फरक पडणार नाही. फलंदाज डाव्या हाताने खेळतो की उजव्या, हे महत्वाचं नाही. खेळाडूची कामगिरी आणि फॉर्म लक्षात घेऊनच निवड केली पाहिजे, स्क्वॉडमध्ये किती डावखुरे फलंदाज घेतले पाहिजेत, या गोष्टींना काही अर्थ नाही, असं गंभीरनं म्हटलं आहे.

गंभीरने म्हटलं की, एक चांगला खेळाडू, जो उजव्या हाताचा असो किंवा डावखुरा असो, तो प्रत्येक परिस्थितीत चांगला खेळेल. जर अय्यर चांगला खेळतो किंवा राहूल धावा करतो, तर त्यांना निवडा. जर ते फॉर्ममध्ये नसतील तर त्यांच्या जागी डावखुऱ्या फलंदाजाची निवड करणं गरजेचं नाही.
डावखुऱ्या फलंदाजांबाबत अशाप्रकारची चर्चा करण्याची आवश्यकता नव्हती, असं मला वाटतं. तुम्ही नेहमीच खेळाडूची गुणवत्ता आणि फॉर्म बघा, पण किती खेळाडू डावखुरे आहेत, हे पाहण्यात वेळ वाया घालवू नका, असं म्हणत गंभीरने शास्त्री यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

Sourav Ganguly agrees with Gautam Gambhir opinion
Sourav Ganguly : ‘तो जे बोलला ते योग्यच…’, गौतम गंभीरने रिकी पॉन्टिंगला दिलेल्या प्रत्युत्तरावर सौरव गांगुलीचे वक्तव्य
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IND vs AUS Paine criticism of Gautam Gambhir ahead Border Gavaskar Trophy
IND vs AUS : ‘… तो भारतीय क्रिकेट संघासाठी योग्य नाही’, रिकी पॉन्टिंगनंतर टिम पेनने गौतम गंभीरवर साधला निशाणा
Nitin Gadkari : “आजकाल समझोत्याचे राजकारण सुरू, संख्याबळाला…”, मुख्यमंत्री पदावरून नितीन गडकरींचं मोठं विधान
Ricky Ponting Hits Back at Gautam Gambhir over Virat Kohli Form Remarks Said He is quite a prickly character
Ricky Ponting on Gautam Gambhir: “स्वभावच इतका चिडचिडा…”, गौतम गंभीरबाबत रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य, विराट कोहलीच्या फॉर्मवरून रंगला वाद
CCI probe finds Zomato, Swiggy violating competition norms
स्पर्धा आयोगाकडून चौकशीवर अंतिम निवाडा आला नसल्याचा दावा
Gautam Gambhir Backs KL Rahul With Big Statement Said How Many Teams Have a Player Like Him Border Gavaskar Trophy
Gautam Gambhir on KL Rahul: “केएल राहुलसारखे खेळाडू किती देशात आहेत?”, गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?

नक्की वाचा – वनडेत लाजिरवाणा विक्रम! तरीही आशिया चषकात प्रवेश, आता विश्वचषकही खेळणार टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू , कारण…

रवी शास्त्री काय म्हणाले ?

टीम इंडियाचा मध्यमक्रम मजबूत करण्यासाठी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजासह आणखी दोन डावखुरे फलंदाज असू शकतात. पण ही जबाबदारी निवड समितीची आहे. कोणता खेळाडू फॉर्ममध्ये आहे, हे त्यांनी पाहावं. जर तिलक वर्मा चांगल्या फॉर्ममध्ये आहे, तर त्यांना टीममध्ये सामील करा. जर तुम्हाला वाटत असेल, यशस्वी जैस्वाल चांगली कामगिरी करत आहे, तर त्यालाही संघात समाविष्ट करू शकता. जर इशान किशन गेल्या सहा महिन्यांपासून खेळत असेल आणि विकेटकिपींगही करत असेल, तर त्याचा समावेश केला पाहिजे. पण दोन डावखुऱ्या फलंदाजांनाही संघात जागा मिळाली पाहिजे.