BCCI Denies Gautam Gambhirt Coaching Staff Recommendations: भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ९ जुलै रोजी बीसीसीआयकडून निवड करण्यात आली. मुख्य प्रशिक्षक म्हणून रूजू होण्यापूर्वीच बीसीसीआयने गंभीरला मोठा धक्का दिला आहे. गौतम गंभीरबरोबर भारताचे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक कोण असणार हा मोठा प्रश्न आहे. बीसीसीआय मुख्य प्रशिक्षकांना आपला सपोर्ट स्टाफ निवडण्याची मुभा देतात. पण गंभीरने सुचवलेली नावं बीसीसीयने नाकारलं असल्याची मोठी माहिती एका अहवालात समोर आली आहे.
राहुल द्रविडप्रमाणेच भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांचा कार्यकाळही टी-२० विश्वचषकाने संपला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) द्रविड, राठोड, म्हांब्रे आणि दिलीप यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. श्रीलंका दौऱ्यापासून मुख्य प्रशिक्षक गंभीर यांच्या नेतृत्वाखालील नवीन कोचिंग स्टाफसह सुरूवात करणार आहे. परंतु बोर्डाने गोलंदाजी प्रशिक्षक आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक पदांसाठी गंभीरची निवड नाकारली आहे.
हेही वाचा – IND vs ZIM मधील अखेरचे दोन टी-२० सामने कुठे लाइव्ह पाहता येणार? जिओ, हॉटस्टर नाही तर…
गंभीरने सुचवलेल्या विनय कुमारनंतर जॉन्टी रोड्सच्या नावाला BCCIचा नकार
गौतम गंभीरने क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून जॉन्टी रोड्सचं नाव सुचवलं होतं. पण बीसीसीआयने त्यात्या या निवडीला नकार दिला आहे. रोड्सने यापूर्वी गंभीरसोबत लखनऊ सुपर जाट्समध्ये काम केले होते, जिथे गंभीर मेंटॉर होता. बीसीसीआय राष्ट्रीय संघासाठी अखिल भारतीय सपोर्ट स्टाफ निवडण्याच्या आपल्या धोरणावर ठाम आहे, ही पद्धत गेल्या सात वर्षांपासून सुरू आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय सपोर्ट स्टाफसाठी परदेशी खेळाडू घेण्यास इच्छुक नाही. तर बीसीसीआयने भारताचा माजी वेगवान गोलंदाज आर विनय कुमारचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून गंभीरचा प्रस्तावही नाकारला.
गंभीरने याशिवाय नेदरलँड्सचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडी रायन टेन डोस्चेटचा त्याच्या सपोर्ट स्टाफमध्ये समावेश करण्याचा विचार बीसीसीआयसमोर मांडल्याचे वृत्त क्रिकबझकडून आले होते. कोलकाता नाईट रायडर्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम केलेले टेन डोस्चेट कॅरिबियन प्रीमियर लीग आणि मेजर लीग क्रिकेटमधील फ्रँचायझी संघांमध्ये देखील आहेत.
गंभीरच्या या शिफारशी असूनही, बीसीसीआयने हे स्पष्ट केले आहे की सपोर्ट स्टाफच्या रचनेचा अंतिम निर्णय पूर्णपणे बोर्डाकडे आहे. गंभीरसोबत काम करणाऱ्या सपोर्ट स्टाफबाबत सर्वच जण आता बीसीसीआयच्या अंतिम निर्णयाची वाट पाहत आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीर प्रशिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरूवात करणार आहे.