Gautam Gambhir Fighting Incident with Truck Driver: भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीरचा राग सर्वांनाच माहीत आहे. त्याला मैदानावर अनेकदा राग आल्याने तो वाद घातलाना दिसला आहे. मैदानाबाहेरही त्याचा स्वभाव तसाच आहे. टीम इंडियाचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने याबाबत एक किस्सा सांगितला आहे. गौतम गंभीरने एकदा ट्रक ड्रायव्हरबरोबरही भांडण केले होते आणि त्याची कॉलर पण पकडली होती.

आकाश आणि गौतम हे देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळायचे. दोघेही संघासाठी सलामीवीराची भूमिका निभावत असतं. आकाश चोप्राने सांगितले की, गौतम गंभीरचे ट्रक ड्रायव्हरसोबत भांडण झाले होते. आकाश चोप्राने राज सामानीच्या पॉडकास्टवर गौतम गंभीरबरोबरच्या त्याच्या नात्याबद्दल, त्यांच्या खेळाबद्दल मोकळपणाने गप्पा मारल्या. ते दोघेही मित्र नाहीत हे सांगायलाही आकाशा चोप्रा मागे राहिले नाहीत.

Who Is D Gukesh Indian Grandmaster Who Became Youngest Ever World Chess Champion
Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Nitin Gadkari on Road Accidents
Nitin Gadkari: ‘मी तेव्हा माझे तोंड लपवतो’, नितीन गडकरींनी लोकसभेत बोलताना व्यक्त केली खंत
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
drunk driver injures woman police officer at checkpost
नाकाबंदीत मोटारचालकाने महिला पोलीस हवालदाराला फरफटत नेले
Sunil Gavaskar Statement on India Defeat
IND vs AUS: “हॉटेलच्या रूममध्ये बसून…”, सुनील गावस्कर पराभवानंतर भारतीय संघावर संतापले, रागाच्या भरात नेमकं काय म्हणाले?
Rohit Sharma Statement on Mohammed Siraj and Travis Head Fight in IND vs AUS 2nd Test
IND vs AUS: “मर्यादा ओलांडायला नको…”, रोहित शर्माने सिराज-हेडच्या वादात भारतीय गोलंदाजाची घेतली बाजू, सामन्यानंतर केलं मोठं वक्तव्य
Travis Head Statement on Mohammed Siraj Fight and Send Off Said I Said Well Bowled IND vs AUS 2nd Test
Travis Head on Siraj Fight: “मी म्हणालो चांगला चेंडू होता पण त्याने…”, सिराज आणि हेडमध्ये नेमका कशावरून झाला वाद? ट्रॅव्हिस हेडने सामन्यानंतर सांगितलं

हेही वाचा – Younis Khan: “खेळण्यापेक्षा बडबडचं जास्त…”, बाबर आझमला सुनावताना पाकिस्तानच्या युनूस खानने विराट कोहलीबाबत केलं मोठं वक्तव्य

गौतम गंभीरबद्दल सांगताना आकाश चोप्राने एक किस्सा सांगितला, दिल्लीच्या ड्रेसिंग रूममधील काही घटना सांगितल्या. यावेळी चोप्राने गौतम गंभीरने ट्रक ड्रायव्हरशी भांडण करून त्याची कॉलर पकडल्याची घटनाही सांगितली. आकाश चोप्रा म्हणाला, “आम्ही दोघे एकमेकांचे खरंतर स्पर्धक होतो कारण आम्ही एकाच जागेसाठी लढत होतो. आमची टीम खूप चांगली होती. आम्ही खेळायचो तेव्हा कोहली आणि धवनपैकी एकालाच खेळण्याची संधी मिळायची, अशी टीम होती. खरं तर वीरूलाही सलामीला उतरण्याची संधी नाही मिळायची. वीरेंद्र सेहवाग चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत असे, जेणेकरून शिखर किंवा विराटला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करता येईल.”

हेही वाचा – Rohit Sharma: “रोहित तंत्रकुशल नाही, तो कठोर सरावही करत नाही”, जॉन्टी ऱ्होड्स रोहित शर्माबद्दल नेमकं काय म्हणाला? सचिनचा उल्लेख करत म्हणाला…

आकाश चोप्रा गौतम गंभीरबद्दल म्हणाला, “आम्ही सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी होतो. खरे सांगायचे तर तो माझा मित्र नव्हता. तापट मुलगा. त्याच्या कामात तो खूप मेहनती होता. थोडा गंभीर असायचा, पण त्याने खूप धावा केल्या. तो नेहमी आपल्या भावनांबद्दल मोकळेपणाने बोलत असे. त्याचा स्वभावचं असा होता की त्याला खूप लवकर राग येतो. पण प्रत्येक जण वेगवेगळा असतो. गौतम तर असा आहे की त्याचं एकदा दिल्लीत ट्रक ड्रायव्हरशी भांडण झालं होतं. तो त्याच्या कारमधून खाली उतरला, ट्रकवर चढला आणि त्याने ड्रायव्हरची कॉलर पकडली कारण ट्रक ड्रायव्हरने चुकीचा टर्न घेतला होता आणि आम्हालाच शिवीगाळ करत होता.”

Story img Loader