Gautam Gambhir gave a sharp reply to Venkatesh Prasad:भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर हा लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर आहे. त्याच फ्रँचायझी संघाचे नेतृत्व केएल राहुल करत आहेत. केएल राहुल गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीमुळे टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. अलीकडच्या काळात, केएल राहुलने कसोटी संघाचे उपकर्णधारपद गमावले, त्यानंतर त्याला कसोटी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले.

इतकेच नाही तर माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी ट्विटरवर केएल राहुलचा असा बँड वाजवला, ज्यानंतर बराच काळ वाद सुरू झाला होता. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील सलामीच्या सामन्यात केएल राहुलच्या मॅचविनिंग खेळी केली. त्यानंतर व्यंकटेश प्रसादनेही या फलंदाजाचे कौतुक करणारे ट्विट केले. या सगळ्यात गौतम गंभीरने केएल राहुलच्या समर्थनार्थ पुढे येऊन त्याच्या टीकेबाबत व्यंकटेश प्रसादचे नाव न घेता त्याला बरेच काही सांगितले.

uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”

स्पोर्ट्स तकवर, जेव्हा गंभीरला विचारण्यात आले की, आयपीएल २०२३ मध्ये केएल राहुलवर दबाव असेल का, तेव्हा तो म्हणाला, “कसला दबाव? गेल्या मोसमात, आम्ही (लखनौ सुपर जायंट्स) क्रमांक-३वर स्पर्धा संपवली. राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपरजायंट्स यांच्यात चुरशीची लढत होती. एकच संघ ट्रॉफी उचलू शकेल आणि गुजरात टायटन्सने विजेतेपद पटकावले हे उघड होते. गेल्या मोसमात त्याने दमदार खेळ दाखवला. जर तुम्ही लखनौ सुपर जायंट्सच्या डेब्यू सीझनकडे बघितले तर, आम्ही नेट रनरेटमुळे तिसरे स्थान मिळवले, जर तुम्ही आयपीएलमध्ये दुसरे स्थान मिळवले तर तुम्हाला अंतिम फेरीत जाण्याच्या दोन संधी मिळतात.”

हेही वाचा – IPL 2023: ख्रिस गेलचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाला, ‘या’ तीन खेळाडूंमुळे आरसीबीला एकही ट्रॉफी जिंकता आली नाही

आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट दोन्ही भिन्न –

गंभीर पुढे म्हणाला, “जिथपर्यंत केएल राहुलचा संबंध आहे, मला वाटत नाही की तो कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. आयपीएलमध्ये १००० धावा करूनही तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा केल्या नाहीत, तर तुम्हाला टीकेला सामोरे जावे लागेल. आणि हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे, कारण भारताकडून फक्त १५ खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते, आयपीएलमध्ये १५० खेळाडू निवडले जातात, त्यामुळे या दोघांची (आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट) तुलना करू नका.”

हेही वाचा – WPL 2023: बहारदार कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला खेळाडू

माजी क्रिकेटपटूंना मसाला हवा असतो –

गंभीर पुढे म्हणाला, “राहुलच्या नावावर आयपीएलमध्ये चार-पाच शतके आहेत आणि तुम्ही अशा खेळाडूबद्दल बोलत आहात. ज्याने चार-पाच शतके झळकावली आहेत. इतकेच नाही तर गेल्या मोसमातही त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक झळकावले होते. कधी-कधी माजी क्रिकेटपटूंना मसाला हवा असतो, जेणेकरून ते प्रसिद्धीच्या झोतात राहतात. त्यामुळे अशा परिस्थितीत ते अशा खेळाडूंवर टीका करतात. मला वाटतं केएल ज्या प्रकारचा खेळाडू आहे, त्याच्यावर कोणतेही दडपण असणार नाही. एका खेळाडूच्या जोरावर तुम्ही स्पर्धा जिंकू शकत नाही. ड्रेसिंग रूममध्ये २५ खेळाडू आहेत, ज्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.”