आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा यूएईमध्ये सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मंगळवारी ४१ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. या सामन्यादरम्यान रविचंद्रन अश्विन आणि इऑन मॉर्गन यांच्यातील वादाची बरीच चर्चा रंगली होती. याच वादादरम्यान कॉमेंट्री करत असलेल्या गौतम गंभीरने दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंगला कणखर शब्दात सल्ला दिला. त्याने मॉर्गनला देखील फटकारले.
आयओएन मॉर्गनला आयपीएल दरम्यान अनेक वेळा डगआउटमधून कोड घेताना दिसतो (हावभावांमध्ये सल्ला घेणे). हीच गोष्ट दिल्ली कॅपिटल्सच्या विरोधात दिसली जेव्हा मॉर्गनला संघाचे विश्लेषक नॅथन लीमॉनकडून कोड घेताना पाहिले गेले. याबाबत समालोचक आकाश चोप्रा यांनी गौतम गंभीरला प्रश्न केला, तुम्हाला याबद्दल काय वाटते? ज्याला उत्तर देताना गौतम गंभीर कडक शब्दात म्हणाला की, मी कर्णधार असताना, जर अशा गोष्टी घडल्या असत्या तर मी माझ्या कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असता.
IPL 2021: मैदानावरच का भिडले आर अश्विन आणि इऑन मॉर्गन?; दिनेश कार्तिकने सांगितला संपूर्ण किस्सा
मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआर यांच्यातील सामन्यात रविचंद्रन अश्विन आणि टीम साऊदी यांच्यात पहिल्या डावाच्या शेवटच्या षटकादरम्यान वाद झाले. त्याचवेळी, अश्विन आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनच्या दिशेने जाऊ लागला, तेव्हा केकेआरचा कर्णधार इऑन मॉर्गन काहीतरी बोलला, त्यानंतर अश्विन रागाने मॉर्गनच्या दिशेने जाऊ लागला. या दोघांमध्ये शाब्दीक चकमक झाली. नंतर केकेआरचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने हस्तक्षेप केल्यानंतर वाद मिटला.
या घटनेदरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर कॉमेंट्री करत होता. जेव्हा अश्विन, साउदी आणि मॉर्गन यांच्यात मैदानावर ही घटना घडली, तेव्हा दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग खूप चिडलेला होता. तो डगआउटमधून उठला आणि मैदानाच्या दिशेने जाऊ लागला. त्याचवेळी, सामन्यानंतर पॉंटिंग आणि सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफ पंचांबरोबर याच विषयावर चर्चा करत होते. गौतम गंभीरला दिल्लीच्या कोचिंग स्टाफचा निर्णय अजिबात आवडली नाही.
KKR vs DC : शेवटच्या षटकात आऊट होताच अश्विन साऊदीशी भिडला; पाहा नेमकं झालं काय?
गंभीरने रिकी पाँटिंगला कठोर शब्दात सल्ला दिला आणि सांगितले की, “कोचने कोचसारखंच राहावं आणि मैदानावर जाऊन प्रत्येक गोष्टीत पाय टाकण्याची गरज नाही. तुम्ही कोच आहात आणि तुमची मर्यादा डगआउट पर्यंत असावी. ही बाब दोन खेळाडूंमधील असून येथे कोचिंग स्टाफचे कोणतेही काम नाही. जर या प्रकरणात कोणी निर्णय घेऊ शकत असेल, तर तो मॅच रेफरी आणि फील्ड अंपायर आहे. या प्रकरणात प्रशिक्षक कधीही मैदानावर येऊ नये.”