Gautam Gambhir likely to take a break from IPL 2023: माजी भारतीय क्रिकेटपटू आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) गौतम गंभीरची आजकाल बरीच चर्चा आहे. खरं तर, मीडियामध्ये असा दावा केला जात आहे की, आगामी आयपीएल २०२४ मध्ये गौतम गंभीर लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) च्या मार्गदर्शक म्हणून दिसणार नाही. कारण दोघांमध्ये सर्व काही ठीक नाही. २०११ चा विश्वचषक विजेता कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) मध्ये सामील होणार असल्याचा दावा काही अहवालांमध्ये केला जात आहे, म्हणून त्याने एलएसजीमधून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे गौतम गंभीर आयपीएलपासून होणार दूर –
दरम्यान, आता बातम्या येत आहेत की गौतम गंभीर इतर कोणत्याही फ्रँचायझीमध्ये सामील होणार नाही, उलट लोकसभा निवडणुकीमुळे त्याला एक वर्षासाठी आयपीएलमधून ब्रेक घेणे भाग पडले आहे. गौतम गंभीर सध्या खासदार आहे. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी पूर्व दिल्ली मतदारसंघात मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. तसेच तो दिल्लीतील भाजपसाठी लोकप्रिय व्यक्ती बनला आहे.
या घडामोडीची माहिती असलेल्या एका सूत्राने ‘क्रिकेटनेक्स्ट’ला सांगितले: “होय, राजकीय वचनबद्धतेमुळे गौतम गंभीर आयपीएल २०२४ मधून ब्रेक घेऊ शकतो. तो इतर कोणत्याही संघात सामील होत नाही किंवा लखनऊ फ्रँचायझी सोडत नाही. गौतम गंभीरला लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बरीच राजकीय कामे करायची आहेत. त्यामुळे त्याला आपली सर्व शक्ती त्यावर केंद्रित करायची आहे.”
आगामी हंगामातून गौतम गंभीर घेऊ शकतो ब्रेक –
ते पुढे म्हणाले, “दिल्लीतील भाजपसाठी गौतम हा एक मोठा चेहरा आहे आणि त्याची लोकप्रियता इतर ठिकाणीही प्रचंड आहे. त्यामुळे तो पुढील वर्षी निवडणुकीच्या कामात सक्रियपणे सहभागी होईल आणि त्यामुळे त्याच्याकडे आयपीएलसाठी पुरेसा वेळ नसेल. त्यामुळे तो आगामी हंगामातून विश्रांती घेऊ शकतो.”