Gautam Gambhir reacts onVirat-Naveen Friendship: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधीव ९वा सामना ११ ऑक्टोबर रोजी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत आठ गडी राखून विजय मिळवला. सामन्यादरम्यान मैदानात असे काही पाहायला मिळाले, ज्यामुळे क्रिकेटप्रेमींना आनंद झाला. आयपीएलमध्ये झालेली भांडणे विसरून विराट कोहली आणि नवीन उल हक मैदानावर मैत्रीपूर्ण स्थितीत दिसले. दरम्यान, दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना मिठी मारली. हा क्षण पाहताच चाहते क्षणभरात आनंद नाहून गेले. शेवटी दोन्ही खेळाडू आता मित्र बनले आणि क्रिकेट जिंकले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आयपीएल दरम्यान कोहली आणि नवीन उल हक यांच्यात झालेल्या भांडणात गौतम गंभीर देखील सहभागी होता. आता हे दोन्ही खेळाडू आपापली नाराजी विसरून जवळ आल्याने त्यांनाही खूप आनंद झाला आहे. स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करताना तो म्हणाला, ‘वाद मैदानावर होत असतात, मैदानाबाहेर नाही. प्रत्येक खेळाडूला आपल्या संघासाठी लढण्याचा आणि जिंकण्याचा अधिकार आहे. तुम्ही कोणता संघ/देश किंवा स्तरावरील खेळाडू आहात याने काही फरक पडत नाही. आम्ही एक चांगली गोष्ट पाहिली आहे.’

गौतम गंभीर पुढे म्हणाला, ‘कोहली आणि नवीन यांच्यात सुरू असलेला वाद आता संपुष्टात आला आहे. मी चाहत्यांना आवाहन करतो की, सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही खेळाडूला अनुचितपणे लक्ष्य करू नका. तो (नवीन) पहिल्यांदाच आयपीएलमध्ये भाग घेत होता, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. तो अफगाणिस्तानसाठी सहभागी होतो, ही त्याच्यासाठी मोठी गोष्ट आहे.’

हेही वाचा – AUS vs SA, World Cup 2023: ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

कोहली-नवीन वादात झाली होती गंभीरची एन्ट्री –

https://x.com/_Cricpedia/status/1653240202352267264?s=20

४१ वर्षीय गौतम गंभीर हा टीम इंडियाचा माजी खेळाडू आहे. आयपीएल २०२३ दरम्यान, विराट कोहली आणि अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक एका सामन्यादरम्यान समोरासमोर आले होते. यानंतर गंभीरने नवीनला साथ दिली. कारण नवीन त्याच्या लखनऊ सुपर जायंट्स संघाचा एक भाग होता. त्याच्या संघातील खेळाडू आपल्या कुटुंबासारखे आहेत, असे त्याचे मत आहे.