Gautam Gambhir Picks All Time Playing XI: भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ऑल टाईम वर्ल्ड प्लेईंग इलेव्हन निवडली आहे. ज्यात पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी तीन दिग्गज आणि दक्षिण आफ्रिकेतील दोन दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. गंभीरच्या वर्ल्ड इलेव्हनमध्ये वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि इंग्लंडचा प्रत्येकी एक खेळाडू आहे. पण या इलेव्हमनमध्ये न्यूझीलंड संघाचा एकही खेळाडू नाही.
हेही वाचा – Robin Uthappa: “माझी जी अवस्था झाली होती त्याची लाज वाटत असे”, रॉबिन उथप्पाने उलगडला तो अवघड काळ
हल्ली माजी क्रिकेटपटू हे वर्ल्ड प्लेईंग इलेव्हन जाहीर करत आहेत. यामध्ये माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने तो ज्या खेळाडूंविरूद्ध खेळला आहे, त्याच्या आधारावर त्याची प्लेइंग इलेव्हन निवडली होती. या एपिसोडमध्ये आता टीम इंडियाचे माजी सलामीवीर आणि सध्याचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्यांच्याविरूद्ध खेळलेल्या सर्वोत्तम प्लेईंग इलेव्हनची निवड केली आहे. गंभीरने या प्लेईंग इलेव्हनमध्ये अशा खेळाडूंची निवड केली आहे ज्यांच्याविरुद्ध तो खेळला आहे आणि हे खेळाडू त्याच्यासाठी आव्हानात्मक होते.
हेही वाचा – Jay Shah ICC Chairman: जय शाह आता ICC चे अध्यक्ष होणार, ‘या’ व्यक्तीने शर्यतीतून घेतली माघार
स्पोर्ट्सकीडाच्या वृत्तानुसार, गंभीरने पाकिस्तानच्या इंझमाम उल हक, अब्दुल रज्जाक आणि शोएब अख्तरचा त्याच्या वर्ल्ड इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा ॲडम गिलख्रिस्ट, मॅथ्यू हेडन आणि अँड्र्यू सायमंड यांनाही स्थान देण्यात आले. गंभीरने दक्षिण आफ्रिकेचा माजी विस्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स आणि वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केल यांचाही समावेश केला आहे. टीम इंडियाचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मॉर्केलची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. जो बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात सामील होणार आहे.
हेही वाचा – BCCI Earnings: IPL 2023 मुळे BCCI मालामाल, तब्बल ५,१२० कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक कमाई, पण GST तब्बल…
वर्ल्ड प्लेईंग इलेव्हन सांगताना गंभीरने सर्वप्रथम यष्टिरक्षक फलंदाज गिलख्रिस्टचे नाव घेतले. त्यानंतर हेडन, डिव्हिलियर्स, ब्रायन लारा, सायमंड्स, इंझमाम उल हक, रज्जाक, मुथय्या मुरलीधरन, शोएब अख्तर, मॉर्केल आणि अँड्र्यू फ्लिंटॉफ यांची नावे घेतली गेली. पण न्यूझीलंडचा एकही खेळाडू टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गंभीरच्या इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकला नाही.
गौतम गंभीरची ऑल टाइम वर्ल्ड इलेव्हन:
ॲडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया), मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया), एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका), ब्रायन लारा (वेस्ट इंडिज), अँड्र्यू सायमंड्स (ऑस्ट्रेलिया), इंझमाम उल हक (पाकिस्तान), अब्दुल रज्जाक (पाकिस्तान), मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका), शोएब अख्तर (पाकिस्तान), मोर्ने मॉर्केल (दक्षिण आफ्रिका), अँड्र्यू फ्लिंटॉफ (इंग्लंड).
© IE Online Media Services (P) Ltd