Gautam Gambhir said MS Dhoni sacrificed his batting for the sake of captaincy: भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. विशेषत: महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्याबाबत दिलेल्या विधानांबाबत. गंभीर अनेकदा या दोन खेळाडूंवर टीका करतो, असे मानले जाते. मात्र आशिया कपच्या अंतिम सामन्यानंतर गंभीरने धोनीबद्दल जे वक्तव्य केले, त्यावर चाहत्यांना विश्वास बसत नाहीय. कारण गौतम गंभीरने आशिया चषकातील एका सामन्यात माजी कर्णधार एमएस धोनीचे कौतुक केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गौतम गंभीरच्या म्हणण्यानुसार, एमएस धोनी जर तिसऱ्या क्रमांकावर खेळला असता, तर त्याने आपल्या कारकिर्दीतील अनेक विक्रम मोडले असते. स्टार स्पोर्ट्सवरील एका कार्यक्रमादरम्यान तो म्हणाला, “जर धोनीने कारकिर्दीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली असती, तर मला खात्री आहे की तो अनेक एकदिवसीय विक्रम मोडू शकला असता.”

कर्णधारपदामुळे धोनीने फलंदाजीत खूप त्याग केला –

गंभीर पुढे म्हणाला, “कर्णधार म्हणून त्याच्या कामगिरीबद्दल लोक नेहमी बोलतात, जे अगदी खरे आहे. पण मला वाटतं त्याच्या कर्णधारपदामुळे त्याने फलंदाजीत खूप त्याग केला. त्याच्या बॅटने त्याला आणखी बरेच काही साध्य करता आले असते, जे त्याने केले नाही. जेव्हा तुम्ही कर्णधार असता तेव्हा हे घडते. कारण तेव्हा तुम्ही संघाला प्राधान्य देता आणि स्वतःला विसरता.”

हेही वाचा – IND vs AUS: आशियाई चॅम्पियन झाल्यानंतर विश्वचषकापूर्वी भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

धोनी जर कर्णधार नसता, तर…

गौतम गंभीर पुढे म्हणाला, “त्याने सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला सुरुवात केली. जर तो कर्णधार नसता, तर तो भारताकडून तिसऱ्या क्रमांकावर खेळत राहिला असता. त्यामुळे मला वाटते की, तो त्याच्यापेक्षा जास्त धावा करू शकला असता आणि आणखी शतकेही करू शकला असता.” याआधी आशिया चषकाच्या एका सामन्यातही गंभीरने धोनीचे कौतुक केले होते. गंभीरच्या मते, रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीत जे काही मिळवले आहे, त्यामागे महेंद्रसिंग धोनीचे हात आहे. गंभीरच्या मते, धोनीने रोहितला त्याच्या सुरुवातीच्या संघर्षात त्याला सतत साथ दिली.

हेही वाचा – IND vs SL: ‘भारत विश्वचषकातील सर्वात धोकादायक संघ…’; टीम इंडियाबद्दल बोलताना शोएब अख्तरने रोहितच्या नेतृत्त्वाचे केले कौतुक

धोनीची वनडे कारकीर्द कशी होती?

धोनीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने ३५० एकदिवसीय सामने खेळले. ज्यामध्ये त्याच्या नावावर ५०.५७ च्या सरासरीने एकूण १०७७३ धावा आहेत. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीबद्दल बोलायचे, तर धोनीने भारतासाठी १६ एकदिवसीय सामने खेळले. जिथे त्याने ८२.७५ च्या सरासरीने आणि ९९.६९ च्या स्ट्राईक रेटने ९९३ धावा केल्या. या काळात माहीने ६ अर्धशतके आणि २ शतके झळकावली. दोन्ही शतके अगदी ऐतिहासिक होती. पाकिस्तानविरुद्ध १४८ धावा आणि श्रीलंकेविरुद्ध १८३ धावा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautam gambhir praising ms dhoni and said he sacrificed his batting for the sake of captaincy vbm
Show comments