वर्ल्डकपसाठी काही दिवसांचा अवधी बाकी राहिला आहे. वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघाची निवड करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी प्रत्येक दिग्गज आपल्या १५ जणांच्या संघाची निवड करत आहेत. यामध्ये आता माजी सलामीवीर गौतम गंभीरची भर पडली आहे. गंभीरने २०१९ मध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठीची स्वत:च्या भारतीय संघाची निवड केली आहे. गंभीरने यामध्ये अनेक धक्कादायक निर्णय केले आहेत. गंभीरने दुसऱ्या यष्टीरक्षकासाठी सुरू असलेल्या लढाईत पंत आणि कार्तिक यांची निवड केली नाही. दोघांनाही त्याने संघाच्या बाहेर ठेवले आहे.

त्याशिवाय फिरकी गोलंदाज म्हणून जाडेजाला बाहेरचा रस्ता दाखवत अश्विनची निवड केली आहे. अश्निच्या अनुभाव भारतीय फिरकी गोलंदाजांना कामाला येईल असे गंभीरचे मत आहे. अश्निनेन आपला अखेरचा एकदिवसीय सामना जुलै २०१७ मध्ये खेळला आहे.

स्टार स्पोर्टससोबत बोलताना गंभीरने स्वत:ची भारतीय संघाची निवड केली आहे. यामध्ये गंभीरने तिसरा सलामिवीर म्हणून केएल राहूलची निवड केली आहे.

गंभीरने निवडलेला संघ –
रोहित शर्मा, शिखर धवन, के.एल राहुल, विराट कोहली(कर्णधार), अंबाती रायुडू, एम.एस धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, विजय शंकर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव</p>

Story img Loader