Gautam Gambhir raises question on NCA about Shreyas Iyer Fitness: आशिया चषक २०२३ च्या सुपर फोर टप्प्यातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर पडला होता. दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर तो पुन्हा अनफिट झाला. याआधीही त्याला पाठीचा त्रास होता, त्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर श्रेयस अय्यर संपूर्ण आशिया कपमध्ये खेळला नाही. फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, श्रेयस ९९ टक्के फिट आहे.

दरम्यान, टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने श्रेयस अय्यरच्या विश्वचषक संघातील निवडीवर प्रश्न उपस्थित केला आहे. श्रेयस अय्यरला फिटनेस क्लिअरन्स देण्यास बेंगळुरूस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) घाई करत होती का? गंभीर म्हणाला की, श्रेयस अय्यरने बर्‍याच काळानंतर पुनरागमन केले आणि त्यानंतर केवळ एका सामन्यानंतर तो अनफिट झाला. तो म्हणाला की, अय्यर विश्वचषकाचा भाग होणार नाही. अशा मोठ्या स्पर्धांमध्ये संघ व्यवस्थापन त्याच्यावर विश्वास दाखवणार नाही.

BJP MNS Thackeray groups are aggressive after getting bail for the accused who molested a minor girl thane news
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण: आरोपीला जामीन मिळाल्याने भाजप, मनसे, ठाकरे गट आक्रमक
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Maratha reservation high court
मराठा आरक्षणविरोधातील याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद पूर्ण, आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकार आता भूमिका मांडणार
Loksatta anvyarth Ten years in jail on charges of Naxalism G N Death of Sai Baba
अन्वयार्थ: व्यवस्थारक्षणासाठी तरी मानवाधिकार राखा!
59-year-old man fell in one side love with 17-year-old girl and hit bike due to rejection
५९ वर्षीय वृद्धाचे १७ वर्षीय तरुणीवर जडले एकतर्फी प्रेम, प्रेमापोटी केले असे काही की…
Ratan Tata Died at 86 in Marathi
Raj Thackeray Letter To PM : “रतन टाटा हयात असतानाच भारतरत्न द्यायला हवा होता, पण…”, राज ठाकरेंचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
nitin Gadkari controversial statement
गडकरींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपपुढे पेच, प्रचारात सहभागी करून घेण्याच्या प्रयत्नात अडचणी
cpm polit bureau
सीताराम येचुरींच्या निधनानंतर महासचिवपदी कोणाची निवड होणार? ‘ही’ नावे आहेत चर्चेत!

श्रेयस अय्यरबद्दल काय म्हणाला गौतम गंभीर?

श्रेयस अय्यरबद्दल गौतम गंभीर स्टार स्पोर्ट्सवर म्हणाला, “ही चिंतेची बाब आहे. तुम्ही इतके दिवस बाहेर होता आणि नंतर आशिया कपसाठी परत येता, एक सामना खेळता आणि परत अनफिट होता. मला वाटत नाही की, यानंतर संघ व्यवस्थापन एवढ्या मोठ्या स्पर्धेसाठी त्याची निवड करेल. अय्यर विश्वचषक संघाचा भाग नसून त्याची जागा दुसरे कोणीतरी घेणार हे येत्या काही दिवसांत तुम्हाला दिसेल. तुम्ही नेहमी तंदुरुस्त खेळाडूंसोबत वर्ल्डकपला जायला हवे.”

हेही वाचा – VIDEO: “जर धोनी कर्णधार नसता, तर तो भारताकडून…”; माहीबाबत गौतम गंभीरचं पुन्हा एकदा मोठं वक्तव्य

सध्या फॉर्म कसा आहे माहीत नाही –

गौतम गंभीर म्हणाला, “प्रदर्शन ही वेगळी गोष्ट आहे. कल्पना करा की एखादा खेळाडू क्रॅम्प्स किंवा इतर कशाने त्रस्त असेल, तर तुम्हाला त्याची रिप्लेसमेंट मिळू शकत नाही. त्यामुळे जर अय्यर या स्पर्धेसाठी तंदुरुस्त नसेल, तर त्याच्या दुखापतीमुळे विश्वचषकाचा भाग असणे त्याच्यासाठी खूप कठीण आहे. त्याचबरोबर आपल्याला त्याचा सध्याचा फॉर्म कसा आहे हे माहित नाही.”

हेही वाचा – IND vs SL: ‘भारत विश्वचषकातील सर्वात धोकादायक संघ…’; टीम इंडियाबद्दल बोलताना शोएब अख्तरने रोहितच्या नेतृत्त्वाचे केले कौतुक

गौतम गंभीरने एनसीएच्या कामावर उपस्थित केले प्रश्न –

गौतम गंभीर म्हणाला, “त्याचा कोणताही फॉर्म असला तरी तो ७-८ महिन्यांपूर्वीचा होता. त्यानंतर तो फक्त एकच सामना खेळला होता. त्यामुळे हे दुर्दैवी आहे. प्रश्न विचारायचेच असतील, तर एनएसीएला विचारा. कारण तो इतके महिने तिथे होता आणि त्याला तिथून मंजुरीही मिळाली. कोणास ठाऊक, कदाचित त्यांनी खूप लवकर मंजुरी दिली असेल?”