Gautam Gambhir says As I have said we are a champion team irrespective So chin up boy: आयसीसी एकदिवसीय विश्वचक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून भारताचा पराभव केला. त्याचबरोबर सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. परंतु टीम इंडियाचे तिसऱ्यांदा विश्वविजेते होण्याचे स्वप्न भंगले. यानंतर टीम इंडियाचे खेळाडू निराशा असल्याचे दिसून आले. ज्यावर आता माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसला. त्याचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

१९ नोव्हेंबर रोजी भारताने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ गमावल्यानंतर, माजी क्रिकेटपटू सोशल मीडियावर विविध वक्तव्य करत आहेत. अनेक माजी खेळाडू भारतीय खेळाडूंना फटकारताना दिसले, तर काही दिग्गजांनी संघाचे समर्थन केले. दरम्यान, गौतम गंभीरही टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी पुढे आला आहे. त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर केली. गौतम गंभीरने ‘एक्सवर’ (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करताना लिहले, “मी म्हटल्याप्रमाणे, आम्ही एक चॅम्पियन संघ आहोत. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंनी मान उंच ठेवावी. ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन!”

Gautam Gambhir and Virat Kohli on Jasprit Bumrah Mohammed Shami and Mohammed Siraj
Gautam Gambhir : बुमराह, शमी, सिराजसाठी गोलंदाजी हीच ‘ध्यानधारणा व मन:शांती’, गौतम गंभीरचे वक्तव्य
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Cricket Test series, India, bangladesh
भारत-बांगलादेश कसोटी मालिकेवर बिघडलेल्या संबंधांचे प्रतिबिंब? पाकिस्तानप्रमाणेच भारतीय संघालाही बांगला खेळाडू चिथावणार का?
IND vs BAN Rohit Sharma on KL Rahul and Sarfaraz Khan ahead 1st Test match
IND vs BAN : केएल राहुल की सर्फराझ खान? रोहित शर्माने केले स्पष्ट; ‘या’ खेळाडूला मिळणार प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी
Ajit Agarkar to Sent Musheer Khan on Australia Tour with India A Squad Just After 7 Matches Impressed by His Innings
Musheer Khan: मुशीर खानच्या खेळीवर अजित आगरकर फिदा; फक्त ७ सामने खेळूनही जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
PAK vs BAN Test Series Yasir Arafat on PCB
PAK vs BAN : पीसीबी म्हणजे एक सर्कस, त्यात अनेक जोकर भरलेत; माजी खेळाडूची कठोर शब्दात टीका
Musheer Khan Century in India b vs India a
Duleep Trophy 2024: मुशीर खानचे दुलीप ट्रॉफीमध्ये शानदार शतक, भाऊ सर्फराज खानच्या प्रतिक्रियेने वेधले लक्ष, पाहा VIDEO
Pakistan Former Cricketer Javed Miandad Inzamam Ul aq Slams PCB and Cricket Team for Poor Performance PAK vs BAN
PAK vs BAN: “हा एक वाईट संकेत आहे…” फक्त खेळाडू नाही तर PCB वरही भडकले पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू; जावेद मियांदाद, इंजमाम यांच्या वक्तव्याने वेधले लक्ष

केवळ जिंकणारा संघच चॅम्पियन पक्ष नसतो –

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये गौतम गंभीर म्हणाला की, “मला भारतीय संघ आणि देशवासीयांना सांगायचे आहे की, निकाल तुमच्या बाजूने लागला नसला तरीही तुम्ही चॅम्पियन संघ आहात. केवळ जिंकणारा संघच चॅम्पियन पक्ष नसतो. आम्ही १० सामन्यांमध्ये ज्या पद्धतीने कामगिरी केली हा एक प्रवास आहे, त्याचा आनंद घेतला पाहिजे. परिणाम काहीही असो, आपण या विजयांचा आनंद घेतला पाहिजे.”

सामन्याबद्दल बोलायचे तर, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच प्रथम फलंदाजी करायला उतरलेला भारतीय संघ ५० षटकांत २४० धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत ४ विकेट गमावत २४१ धावा करत सामना जिंकला. कांगारू संघासाठी ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक १३७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. मार्नस लाबुशेनने नाबाद ५८ धावा केल्या.

हेही वाचा – VIDEO: फायनलनंतर विराटने मॅक्सवेलला मिठी मारत जिंकली चाहत्यांची मनं, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला दिले खास गिफ्ट

तत्पूर्वी, भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ६६ आणि विराट कोहलीने ५४ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने ४७ आणि सूर्यकुमार यादवने १८ धावा केल्या. कुलदीप यादवने १० धावांचे योगदान दिले. या पाच खेळाडूंशिवाय इतर कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. त्याचबरोबर भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. या स्पर्धेत सलग १० सामने जिंकले होते, मात्र ११व्या सामन्यात संघ मागे पडला. भारताला दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाने शेवटचा पराभव २००३ मध्ये केला होता.