Gautam Gambhir says bowling is like meditation and peace for Bumrah, Shami and Siraj : बीसीसीआय टीव्हीवर विराट कोहलीशी बोलताना गौतम गंभीर म्हणाला, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे प्रमुख खेळाडू आहेत. ज्यांच्या जोरावर टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान आक्रमण तयार केले आहे. भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या म्हणण्यानुसार प्रत्येकाची स्वतःची वेगळी ताकद असते आणि विविध कौशल्ये असतात. मात्र, त्यांच्यात एक गोष्ट सामाईक आहे ती म्हणजे त्या सर्वांसाठी गोलंदाजी म्हणजे ‘ध्यानधारणा व मन:शांती’ आहे.

एका दिवसात २० षटके टाकण्याची क्षमता असलेल्या गोलंदाजांची गरज – गौतम गंभीर

गौतम गंभीरने या तिघांची प्रशंसा केली आणि गोलंदाजांच्या आगामी पिढीसाठी समान वृत्ती असण्याची गरजही व्यक्त केली. गंभीर म्हणाला, आम्हाला चांगले फलंदाज मिळत राहतील, भारतीय क्रिकेटची रचना अशीच आहे. परंतु तरुण पिढीमध्ये आता एका दिवसलात २० षटके टाकण्याची क्षमता आहे का? मी काल जसप्रीतशी बोललो आणि त्याला गोलंदाजी आवडते. त्याला फक्त गोलंदाजी करायची आहे. चेन्नईच्या हवामानात वेगवान गोलंदाजांच्या पुढील पिढीला दिवसातून २० षटके गोलंदाजी करायला आवडते का? आशा आहे की भविष्यात आम्ही अशा खेळाडूंना ओळखू शकू. ज्यांना गोलंदाजीची आवड आहे आणि रात्रंदिवस ते करू इच्छितात.”

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम
Bhaiyyaji Joshi of RSS said India should become super nation not superpower
भारत सुपरपाॅवर नव्हे, सुपरराष्ट्र होण्याची आवश्यकता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन
BCCI New Rule Team India Players May Receive Performance based variable pay After Test Defeat
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पराभव पडणार भारी; थेट पगारावर परिणाम होणार? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Rohit Sharma Practice With Mumbai Ranji Trophy Team at Wankhede Stadium
Rohit Sharma: रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत, हिटमॅनने घेतला मोठा निर्णय; मुंबई संघासह…
Image of Indian Cricket Team
Ind vs Eng T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन
Who is the Indian Shubham Ranjan who will play in BPL 2025 in Bangladesh
BPL 2025 : मराठमोळा शुभम रांजणे बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये

विराट कोहली काय म्हणाला?

गौतम गंभीरशी बोलताना विराट कोहली मोहम्मद शमीबद्दल म्हणाला, मोहम्मद शमी जागतिक दर्जाचा गोलंदाज म्हणून ओळखला जातो. कारण तो सगळ्यात खडतर अशा कसोटी प्रकारातला अव्वल गोलंदाज आहे. एकदिवसीय आणि टी-२० प्रकारातही त्याची कामगिरी चांगलीच आहे. त्याने एकदिवसीय विश्वचषकात जे काही योगदान दिले होते ते खूपच मोलाचे होते.” परंतु, मोहम्मद शमीच्या तुलनेत, बुमराहचा टी-२० रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. मात्र, कोहलीचा शमीप्रमाणेच असा विश्वास आहे की, बुमराह केवळ यॉर्करच नव्हे, तर सर्व फॉरमॅटमध्ये गोलंदाजी करण्याच्या क्षमतेमुळे टी-२० मधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे.

हेही वाचा – SL vs NZ : कमिंदू मेंडिसने सात कसोटीत झळकावले चौथे शतक, श्रीलंकेसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज

मोहम्मद सिराजबद्दल बोलताना विराट कोहली म्हणाला, “सिराजला कसोटी क्रिकेट खेळायचे आहे आणि त्याला कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्याची भूक आहे. त्याचबरोबर त्याला विदेशात जिंकण्याची प्रचंड इच्छा आहे. ही अशी मूल्ये आहेत जी इतर क्रिकेटपटू शिकू शकतात. आम्ही खेळायला सुरुवात केली तेव्हा बुमराहचा सध्याचा गट त्याच पिढीतील नसला तरी त्यांच्यात अजूनही तो उत्साह आहे.”

Story img Loader