Many captains have come and many captains will come but none can match MS Dhoni’s captaincy: भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर त्याच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखला जातो. अशा परिस्थितीत ५ ऑक्टोबरपासून भारतात विश्वचषक सुरू होत असताना गंभीरने महेंद्रसिंग धोनीच्या भारतीय क्रिकेटमधील योगदानाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधारपदावर गंभीरने असे विधान केले आहे, जे माहीच्या चाहत्यांचे मन जिंकत आहे. स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात गंभीर म्हणाला की, कर्णधारपदाच्या बाबतीत कोणीही महेंद्रसिंग धोनीची बरोबरी करू शकत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात बोलताना गौतम गंभीर म्हणाला, “भारतीय क्रिकेटमध्ये एमएस धोनीच्या कर्णधारपदाची बरोबरी कोणीही करू शकत नाही, अनेक कर्णधार आले आणि अनेक कर्णधार येतील. पण मला वाटत नाही की त्याच्या कर्णधारपदाची बरोबरी कोणी करू शकेल. आपल्या नेतृत्वाखाली तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या माणसासाठी यापेक्षा मोठी उपलब्धी असू शकते, असे मला वाटत नाही.”

यापूर्वी सुद्धा गौतम गंभीरने केले होते माहीचे कौतुक –

काही दिवसांपूर्वी गौतम गंभीर म्हणाला होता की, “जर धोनीने कारकिर्दीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली असती, तर तो एकदिवसीय सामन्यांमध्ये अनेक विक्रम मोडू शकला असता. लोक नेहमी कर्णधार म्हणून त्याच्या कामगिरीबद्दल बोलतात, जे अगदी खरे आहे. पण मला वाटतं त्याच्या कर्णधारपदामुळे त्याने फलंदाजीत खूप त्याग केला. त्याला बॅटने आणखी बरेच काही साध्य करता आले असते, जे त्याने केले नाही. हे जेव्हा तुम्ही कर्णधार असता, तेव्हा हे घडते. कारण मग तुम्ही संघाला पहिले प्राधान्य देता आणि स्वतःबद्दल विसरून जाता.”

हेही वाचा – Asian Games: सरबजोत आणि दिव्याने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्यपदकावर कोरले नाव

एमएस धोनीने २००७ मध्ये भारताचे कर्णधारपद स्वीकारले आणि पहिल्याच वर्षी टी-२० विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरला. गंभीर आणि धोनी यांनी मिळून टीम इंडियासाठी आयसीसी विश्वचषक २०११ चे विजेतेपद पटकावले होते. या दोघांनी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शानदार अर्धशतके झळकावली. धोनीने नाबाद ९१ धावा केल्या होत्या, तर गंभीरने ९७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली होती.

हेही वाचा – AUS vs NED: ऑस्ट्रेलियन संघ राजकोटच्या उष्णतेतून थेट पोहोचला केरळच्या सुंदर वातावरणात, वॉर्नरने शेअर केला VIDEO

महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली, भारताने ३ आयसीसी विजेतेपद जिंकले, ज्यात एकदिवसीय विश्वचषक, टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचाही समावेश आहे. २०१९ चा विश्वचषक धोनीचा शेवटचा होता, त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कायमचा निरोप घेतला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautam gambhir says many captains have come and many captains will come but none can match ms dhonis captaincy vbm
Show comments