Anant Radhika Wedding Shahrukh Khan and Gautam Gambhir Video: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला जगभरातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खान आणि टीम इंडियाचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही या शानदार सोहळ्याला हजेरी लावली. या लग्नात कोलकाता नाईट रायडर्सचा सहमालक शाहरुख खान आणि गौतम गंभीर यांची भेट झाली. या दोघांच्या भेटीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Copa America: फायनलमध्ये लिओनेल मेस्सीच्या पायाला दुखापत, डगआऊटमधील रडतानाचा VIDEO व्हायरल

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Lakhat Ek Aamcha Dada
Video : महेश जाधवचा अभिनेत्रीबरोबर जबरदस्त डान्स; जुई तनपुरे व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आमचा मावळा…”

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख केकेआरचा माजी मेंटॉर गंभीरची गळाभेट घेताना दिसत होता. हे दोघेही गळाभेट घेतानाच एकमेकांशी बोलतही होते. दोन सेलिब्रिटींमधील प्रेम आणि आदर हा यातून दिसून येत होता. तर गंभीरसह त्याची पत्नी होती, तिनेही शाहरूखची भेट घेतली. एक खेळाडू म्हणून, गौतम गंभीरने केकेआरला २०१२ आणि २०१४ मध्ये आयपीएल विजेतेपद मिळवून दिले. यानंतर, तो २०२४ मध्ये केकेआरमध्ये मेंटॉर म्हणून परतला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली त्याने संघाला चॅम्पियन बनवले. पण आता गंभीर आणि केकेआरचा मार्ग पुन्हा वेगळा झाला आहे.

हेही वाचा – ११२व्या मिनिटाला गोल अन् अर्जेंटिनाचा कोलंबियावर विजय; १६व्यांदा जिंकले जेतेपद

टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताला विश्वविजेते बनवल्यानंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. आता गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक म्हणून श्रीलंका दौऱ्यापासून रूजू होणार आहे. नुकताच टीम इंडियाने झिम्बाब्वे दौरा पूर्ण केला. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गेले होते. आता संघाचा पुढील दौरा श्रीलंका दौरा आहे, जो २७ जुलैपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यावर टीम इंडिया ३ सामन्यांची टी-२० आणि ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारताचे वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना श्रीलंका दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात येणार आहे. त्यामुळे हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांना संघाचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते.

Story img Loader