Tanveer Ahmed post viral on Gautam Gambhir India Coach: भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरने पदभार स्वीकारला आहे. श्रीलंका दौरा गंभीर यांचा प्रशिक्षक म्हणून पहिला दौरा असणार आहे. गंभीरने (Gautam Gambhir) पदभार स्वीकारताच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू तनवीर अहमदने प्रतिक्रिया दिली आहे, पण त्याच्या या प्रतिक्रियेने चांगलंच लक्ष वेधून घेतलं आहे. तनवीरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करून गंभीरवर मोठा आरोप केला असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – Mohammad Shami: “१९व्या मजल्यावरच्या बाल्कनीतून…” मोहम्मद शमीने केलेला आत्महत्येचा प्रयत्न, मित्राचा धक्कादायक खुलासा

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Sunil Gavaskar Statement on India Defeat
IND vs AUS: “हॉटेलच्या रूममध्ये बसून…”, सुनील गावस्कर पराभवानंतर भारतीय संघावर संतापले, रागाच्या भरात नेमकं काय म्हणाले?
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?

गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी गंभीरही संघासोबत आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील. पण या सगळ्या दरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटर तन्वीर अहमदने गंभीरवर शिफारसीमुळे मुख्य प्रशिक्षकपद मिळवल्याचा आरोप केला आहे. तनवीरच्या मते, गंभीरपेक्षा व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षकपदासाठी अधिक पात्र होते.

हेही वाचा – Rahul Dravid: पुन्हा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार राहुल द्रविड? KKR नव्हे तर ‘या’ संघासह IPL मध्ये करणार पुनरागमन

एकप्रकारे तनवीरने गंभीरवर व्हीव्हीएस लक्ष्मणची जागा बळकावल्याचा आरोप केला आहे. तनवीरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की “व्हीव्हीएस लक्ष्मण हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक व्हायला हवे होते, कारण ते दीर्घकाळ भारताच्या बी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करत होते. मात्र गौतम गंभीर शिफारस पत्रामुळे प्रशिक्षक झालेत.”

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने आपल्या पोस्टमध्ये ‘पर्ची’ (चिठ्ठी) हा शब्द वापरला आहे. म्हणजेच गौतम गंभीर कोणीतरी केलेल्या शिफारसीमुळे भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाले असल्याचं माजी पाकिस्तानी खेळाडूचं म्हणणं आहे. यासह तनवीरने आपल्या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की व्हीव्हीएस लक्ष्मण खरोखरच प्रशिक्षक बनण्यास पात्र होते. तन्वीरची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Olympics 2024: ऑलिम्पिकच्या लोगोमध्ये पाच वर्तुळ का असतात? काय आहे याचा अर्थ; जाणून घ्या

दुसरीकडे, भारतीय संघ पहिल्या सराव सत्रात गंभीरसह सहभागी झाला आहे. ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेत पोहोचला आहे. रोहित शर्मानंतर सूर्यकुमार यादवच्या रूपात भारतीय संघाला नवा टी-२० संघाचा कर्णधार मिळाली आहे. तर वनडे मालिकेत संघाचे नेतृत्त्व रोहित शर्माकडे असणार आहे. भारतीय संघाचा पहिला टी-२० सामना २७ ऑगस्ट रोजी श्रीलंकेसोबत होणार आहे. प्रशिक्षक म्हणून गंभीरची ही पहिलीच मोठी परिक्षा असणार आहे.

Story img Loader