क्रिकेटमधील श्रेष्ठ खेळाडू सुनील गावसकर व सचिन तेंडुलकर हे क्रिकेटच्या मैदानावर कधी आमने-सामने खेळले नाहीत मात्र दुबई गोल्फच्या मैदानावर त्यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. तेंडुलकरपाठोपाठ गावस्कर यांनाही येथील ईएलएस गोल्फ क्लबचे आजीव सभासदत्व देण्यात आले आहे. येथील दुबई स्पोर्ट्स सिटीचे भागीदार अब्दुल रहेमान फालाक्नाझ व अध्यक्ष खलीद अल झारुनी यांच्या हस्ते गावसकर यांना सभासदत्वाचे पत्र देण्यात आले. हा क्लब तिरुन गोल्फ व्यवस्थापन संस्थेतर्फे चालविला जातो. सचिनविरुद्ध गोल्फची स्पर्धा होणार काय असे विचारले असता गावसकर म्हणाले, आम्ही यापूर्वी बांगलादेशमध्ये चितगाँग येथील क्लबमध्ये एका गोल्फ स्पर्धेत भाग घेतला होता. सचिन हा खूपच गांभीर्याने गोल्फ खेळतो. अर्थात आम्ही जर येथे एकाच वेळी आलो तर कदाचित आम्ही एकत्रितरीत्या गोल्फचा आनंद निश्चित घेऊ.

Story img Loader