आयपीएलच्या या हंगामात वेगवान शतकी खेळी आणि आतषबाज फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या डावखुऱ्या फलंदाजाचे नाव आता माहितीच्या महाजालावरही धुमाकूळ घालीत आह़े गेलच्या नावाने व्हायरस पसरविणाऱ्या फसव्या संकेतस्थळांकडे नेटकरांना ओढण्याचा उद्योग केला जात असल्याची माहिती ‘मॅकाफी’ या संरक्षक सॉफ्टवेअरच्या निर्मात्यांनी दिली़
‘भारतातील सर्वात धोकादायक क्रिकेटपट्टं’च्या यादीत ‘मॅकाफी’ने गेलबरोबरच ब्रेट ली आणि एस़ श्रीशांत यांचाही समावेश केला आह़े मात्र यात गेलचे स्थान सर्वाँत वरचे आह़े सायबर गुन्हेगारांकडून त्या त्या वेळच्या प्रसिद्धच्या शिखरावर असणाऱ्या व्यक्तींची नावे नेटकरांची दिशाभूल करण्यासाठी वापरण्यात येतात, अशी माहिती ‘मॅकाफी’चे भारतातील उपाध्यक्ष व्यंकटसुब्रमन्यम क्रिश्नपूर यांनी सांगितल़े अशा वेळी क्रिकेटवेडे आपल्या आवडत्या क्रिकेटरची छायाचित्रे आणि चित्रफिती आदीचा नेटवर सातत्याने शोध घेत असतात़ नेमक्या त्याच वेळी व्हायरस असलेल्या धोकादायक लिंकचा पर्याय त्यांच्यापुढे ठेवून सायबर गुन्हेगारांकडून त्यांना फसविण्यात येत़े
अशा पद्धतीने फसवणूक होऊन सायरसग्रस्त झालेल्या संगणकांची संख्या मोजून एकंदरीत धोक्याचे प्रमाण ठरविले जात़े नेटवर गेलच्या नावाने झालेल्या शोधामुळे सायरसबाधित झालेल्या संगणकांची संख्या ३२ आह़े, तर ली आणि श्रीशांत यांच्याबाबत हीच संख्या अनुक्रमे ३१ आाणि ३० आह़े याबरोबरच युवराज सिंग, पोलार्ड, सचिन तेंडुलकर, विराट कोहली आदी नावांनी शोध घेणाऱ्या आणि सायरसबाधित होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे, असे अभ्यासांती पुढे आले आह़े
या छुप्या माध्यमातून नेट हॅकर्स पासवर्ड किंवा इतर वैयक्तिक माहिती चोरत असल्याचे क्रीश्नपूर यांनी सांगितल़े क्रीकेटफॅन्सकडून आवडत्या खेळाडूसंबंधित माहितीचा घेतला जाणारा आंधळा शोध त्यांना अशा संकेतस्थळांचा बळी ठरवित असल्याचेही ते पुढे म्हणाल़े अशा प्रकारे कोणताही माहिती डाऊनलोड करण्यापूर्वी तसेच आपली कोणतीही माहिती पुरविण्यापूर्वी नेटकरांनी आवश्वक काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आह़े
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा