वादग्रस्त माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांचे निकवर्तीय असलेल्या संजय सिंह यांची गुरूवारी ( २१ डिसेंबर ) भारतीय कुस्ती महासंघाच्या ( डब्ल्यूएफआय ) अध्यक्षपदी निवड झाली होती. या निवडीनंतर आघाडीच्या कुस्तीपटूंमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं. अशातच आता क्रीडा मंत्रालयानं ‘डब्ल्यूएफआय’वर मोठी कारवाई केली आहे. क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघाची कार्यकारणी बरखास्त केली आहे. या निर्णयानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कुस्तीपटू गीता फोगाटनं ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर “कुस्तीपटूंना न्याय मिळेल,” अशी आशा व्यक्त केली आहे. “क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघाच्या कार्यकारणीला बरखास्त केलं आहे. हा निर्णय घेण्यास उशिर झाला असला तरी कुस्तीपटूंना न्याय मिळेल, असा आशेचा किरण आहे,” असं गीता फोगाटनं सांगितलं.

हेही वाचा : बरखास्तीनंतर संजय सिंह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मला काहीच माहीत नाही…”

तर, केंद्र सरकारनं याआधीच ‘डब्ल्यूएफआय’वर कारवाई करायला हवी होती, असं मत ऑलिम्पिक पदक विजेते, बॉक्सर विजेंदर सिंग यांनी व्यक्त केलं आहे. “केंद्रानं महिला कुस्तीपटूला निवृत्त होऊन दिलं, ‘पद्मश्री’ पुरस्कार परत करून दिला आणि आता कुस्ती महासंघाच्या कार्यकारणीला बरखास्त केलं आहे. कुस्ती महासंघावर याआधीच कारवाई व्हायला हवी होती,” असं विजेंदर सिंग यांनी ‘एक्स’ अकाउंटवर म्हटलं आहे.

हेही वाचा : कुस्तीगीर संघटनेचे नवे अध्यक्ष म्हणतात, “ब्रिजभूषण सिंह मला मोठ्या भावासारखे”; साक्षी मलिकच्या निवृत्तीवरही केलं भाष्य!

दरम्यान, संजय सिंह यांची गुरूवारी कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिकनं खेळातून निवृत्ती जाहीर केली. तर, शुक्रवारी कुस्तीपटू बजरंग पुनिया याने ‘पद्मश्री’ पुरस्कार परत करण्याचा निर्णय जाहीर केला. संजय सिंह यांची निवड करण्यात आल्यानं हा कटू निर्णय घेतल्याचं पुनियानं स्पष्ट केलं.