RCB vs GG Highlights in Marathi: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा WPL 2025 मधील सलग तिसरा पराभव पत्करावा लागला आहे. गुजरातच्या संघाने आरसीबीला १२४ धावांवर रोखले. ही धावसंख्या आरसीबीची प्रथम फलंदाजी करतान उभारलेली सर्वात कमी धावसंख्या आहे. आरसीबीच्या घरच्या मैदानावर सध्या वुमन्स प्रीमियर लीगमधील सामने खेळवले जात आहेत. पण आरसीबीने सलग तिन्ही सामने गमावले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा फॉर्म खालावताना दिसत आहे. पहिले २ सामने जिंकून मोसमाची सुरुवात केल्यानंतर संघाने सलग ३ सामने गमावले आहेत. WPL 2025 च्या १०व्या सामन्यात गुजरात जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मोठा विजय नोंदवला. बेंगळुरूला १२५ धावांवर रोखल्यानंतर गुजरातने २१ चेंडूत ४ गडी गमावून १२६ धावांचे लक्ष्य गाठले.

गुजरात जायंट्सने शानदार गोलंदाजी करत आरसीबीला १२५ धावांवर रोखले. स्मृती मानधनाच्या संघाने आपल्या सर्वात कमी धावसंख्येची बरोबरी केली. आरसीबीने शेवटच्या चार षटकांत केवळ ३४ धावा केल्या आणि दोन विकेट गमावल्या, यावरून गुजरातची भेदक गोलंदाजी दिसून येते. विजयासाठी आसुसलेल्या तळाच्या गुजरात संघाने चेंडूसह चांगली कामगिरी केली. वेगवान गोलंदाज डिआंड्रा डॉटिन (२/३१) आणि डावखुरी फिरकीपटू तनुजा कंवर (२/१६) यांनी चांगली कामगिरी केली. ऍशले गार्डनर (१/२२) आणि काशवी गौतम (१/१७) यांनी चांगली साथ दिली.

गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गुजरातने झटपट विकेट्सची रांग लावली. पॉवरप्लेमध्ये आरसीबीची धावसंख्या ३ बाद २५ अशी झाली. स्मृती मानधना २० चेंडूत १० धावा, डॅनी व्याट-हॉज ४ चेंडूत ४ धावा आणि एलिस पेरी ४ चेंडूत खातंही न उघडता स्वस्तात बाद झाले. पेरीने मागील चार डावांत तीन अर्धशतकं झळकावली होती. यात ८० हून अधिक धावांच्या दोन डावांचाही समावेश आहे.

कनिका आहुजाने २८ चेंडूत २ षटकार आणि एका चौकारासह ३३ धावा केल्या आणि राघवी बिश्तने १९ चेंडूत २२ धावा करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघींनी ३७ चेंडूत ४८ धावांची भागीदारी रचली. जॉर्जिया वेरेहम २० चेंडूत नाबाद २० धावा आणि ऋचा घोष १० चेंडूत ९ धावा यांनी २१ धावांची भागीदारी करत डावावर पुन्हा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु काशवीच्या यॉर्करने घोषला बाद करत गुजरातने सामन्यात पुनरागमन केले.

गुजरातची कर्णधार एॅश्ले गार्डनर सामन्याची सामनावीर ठरली. गार्डनरने ३१ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांसह ५८ धावा करत मॅचविनिंग खेळी केली. तर लिचफिल्डने ३० धावा केल्या. बेथ मुनी आणि हेमलता १७ आणि ११ धा्वा करत बाद झाले. आरसीबीकडून रेणुकाने २, जॉर्जियाने २ विकेट्स घेतले.