Team India on Suryakumar Yadav: माजी खेळाडू आकाश चोप्राने एकदिवसीय फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी करत नसल्याचे मान्य करत सूर्यकुमार यादवचे कौतुक केले आहे. माहितीसाठी की, सूर्यकुमार यादवने आतापर्यंत २६ एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन अर्धशतक केले असून केवळ ५११ धावा केल्या आहेत. मात्र, एवढे असूनही समालोचक आकाश चोप्राने त्याच्यावर विश्वास ठेवला आहे. तिसऱ्या टी२० सामन्यात ८३ धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिल्यानंतर क्रिकेट वर्तुळात त्याला विश्वचषक २०२३ साठी संघात समाविष्ट करावे अशी चर्चा सुरु आहे.
माहितीसाठी की, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या प्रमुख खेळाडूंना दुखापत झाल्यानंतर २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी सूर्यकुमार यादवला बॅकअप ऑप्शन म्हणून निवडण्यात आली आहे. जरी यादव टी२० फॉरमॅटमध्ये नंबर वन बॅट्समन असला तरी त्याला वनडे फॉरमॅटमध्ये अजून छाप पाडता आलेली नाही.
आकाश चोप्राने त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “सूर्यकुमार यादवने प्रामाणिकपणे कबूल केले की त्याची वन डेतील कामगिरी तितकी चांगली नाही. ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे हे सूर्याला देखील माहीत आहे आणि तो सांगायला अजिबात लाजत नाहीत. यातून तो किती प्रामाणिक आहे हे दिसते.” आकाश चोप्राच्या म्हणण्यानुसार, “सूर्यकुमार यादवने असेही सांगितले की, कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याला सांगितले आहे की त्याला या फॉर्मेटबद्दल पूर्वीपेक्षा थोडे अधिक माहिती आहे.”
आकाश चोप्राने सूर्यकुमार यादवबाबत आपली बाजू मांडली
माजी खेळाडू पुढे म्हणाला, “रोहित शर्मा आणि राहुल द्रविडने सूर्यकुमार यादवला सांगितले आहे की आता त्याला या फॉर्मेटबद्दल थोडे अधिक माहिती आहे. एका फॉरमॅटमधून दुसऱ्या फॉरमॅटमध्ये जाण्यासाठी थोडा जास्त वेळ घेणारा तो एकमेव किंवा पहिला खेळाडू नाही. त्यामुळे त्याला अधिक संधी मिळणे आवश्यक आहे.”
हेही वाचा: Babar Azam: बाबर आझमकडून कर्णधारपद जाणार का? माजी खेळाडू इंझमाम-उल-हकने केला मोठा खुलासा
रोहित शर्माबद्दल चोप्रा पुढे म्हणाला, “जर तुम्ही रोहित शर्माकडे बघितले तर, जेव्हा तो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळत होता, तेव्हा त्याला या फॉरमॅटमध्येही थोडे कठीण वाटत होते. तो चांगली फलंदाजी करायचा पण खराब फटके खेळून बाद व्हायचा. त्यावेळीही लोक त्यांच्यावर जोरदार टीका करत असत. मात्र, जेव्हा रोहितने ओपनिंग सुरू केल्यावर तेव्हा त्याला या फॉरमॅटची माहिती झाली. रोहित आता कसोटी क्रिकेटमध्ये देखील सेट झाला आहे. तसेच, यादवलाही इतर फॉरमॅटची सवय व्हायला थोडा वेळ लागेल.”