विराट कोहली प्रदीर्घ काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांसाठी झगडत आहे. याबाबत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी चिंता प्रकट केली आहे. विराटने चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरावे, जेणेकरून त्याला सूर गवसेल, असे मत गावस्कर यांनी व्यक्त केले.
कोहलीला आपल्या मागील १६ डावांपैकी नवव्यांदा धावांचे दशक ओलांडण्यात अपयश आले. कोची येथील पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याला फक्त २ धावा करता आल्या. हा सामना वेस्ट इंडिजने १२४ धावांनी जिंकला. आवश्यकता भासल्यास संघव्यवस्थापन महत्त्वपूर्ण
बदल करण्यासाठी तयार आहे, असे गावसकर यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘‘विराटचा फॉर्म हरवला आहे, ही अतिशय चिंतेची गोष्ट आहे. मोठय़ा धावसंख्या उभारणाऱ्या फलंदाजासमोर एककातील धावसंख्या दिसणे, हे चांगले नाही. त्यांच्या फलंदाजीतील अनेक तांत्रिक मुद्दे चर्चेत येणे स्वाभाविक आहे. परंतु त्याने फलंदाजीचा क्रम बदलून चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला यावे, असे मला वाटते.’’

Story img Loader