ऑस्टेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल भारतीय तरूणीच्या प्रेमात पडला आहे. भारतीय वंशाच्या विनी रमन या तरूणीच्या प्रेमात मॅक्सवेल क्लीन बोल्ड झाला आहे. मॅक्सवेल आणि विनी मागील दोन वर्षांपासून एकमेंकाच्या प्रेमात आकंठ बुडाली आहेत.

मॅक्सवेल आणि विनी रमन या लव्हबर्डचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मॅक्सवेलनं स्वत: विनीसोबतचा फोटो शेअर केला होता. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, विनी आणि मॅक्सवेल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांचे लग्न झाल्यास मॅक्सवेल भारताचा दुसरा ऑस्ट्रेलियन जावाई होणार आहे. २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटने भारतीय तरूणी मासूम सिंघासोबत लग्न केले आहे. दोघेही आयपीएल पार्टीमध्ये एकमेकांना भेटले होते. त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये होते.

दरम्यान विनी आणि मॅक्सवेल कधी लग्न करणार याबाबत माहिती नसली तरी, मॅक्सवेल लवकरच भारताचा जावई होणार असे दिसत आहे. मॅक्सवेल आणि विनी यांना देशविदेशात फिरताना पाहण्यात आले आहे. विनी रमनने इंस्टाग्राम खात्यावर मॅक्सवेलसोबतचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. ग्लेन मॅक्सवेल सध्या इंग्लंडमधील टी-२० ब्लास्टमध्ये लंकाशायर संघाकडून खेळत आहे.

 

View this post on Instagram

 

Moments like these making the moments apart easier

A post shared by VINI (@vini.raman) on

 

View this post on Instagram

 

Miss you @gmaxi_32  #prettyflyforawhiteguy

A post shared by VINI (@vini.raman) on

Story img Loader