Glenn Maxwell ruled out of the series against SA: एकदिवसीय विश्वचषकापूर्वी पाचवेळचा चॅम्पियन संघ ऑस्ट्रेलियाच्या दुखापतींच्या वाढत्या यादीमुळे चिंता वाढली आहे. कर्णधार पॅट कमिन्ससह चार महत्त्वाच्या खेळाडूंना दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. मात्र, भारत दौऱ्यापूर्वी हे चार खेळाडू तंदुरुस्त होतील, अशी अपेक्षा आहे. पॅट कमिन्स, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क यांच्याशिवाय दक्षिण आफ्रिका दौर्यापासून अनफिट असल्याने त्यांना बाहेर ठेवण्यात आले होते. आता या यादीत ग्लेन मॅक्सवेलचे नाव जोडले गेले आहे.
अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल प्रशिक्षणादरम्यान घोट्याला दुखापत झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेतील टी-२० मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी मॅथ्यू वेडचा संघात समावेश करण्यात आला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या सराव सत्रादरम्यान ३४ वर्षीय खेळाडूच्या डाव्या पायात फ्रॅक्चर झाल्याने त्याच्या डाव्या पायात आधीच प्लेट आहे. परिणामी, ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांनी जोखीम न घेण्याचा निर्णय घेतला आणि मॅक्सवेल विश्वचषकापूर्वी भारतात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी उपलब्ध होईल असा विश्वास आहे.
पॅट कमिन्स मनगटाच्या दुखापतीशी देतोय झुंज –
मनगटाच्या दुखापतीमुळे पॅट कमिन्स दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर पडला. त्याची टी-२० मालिकेत आधीच निवड झाली नव्हती. त्यानंतर त्याला एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आले. विश्वचषकापूर्वी भारत दौऱ्यासाठी तो उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. त्याच्या अनुपस्थितीत मिचेल मार्श संघाचे नेतृत्व करेल.
हेही वाचा – CPL 2023: सुनील नरेनने रचला इतिहास, रेड कार्ड मिळवणारा ठरला जगातील पहिला क्रिकेटपटू
स्टीव्ह स्मिथ आणि मिचेल स्टार्क यांनाही झाली आहे दुखापत –
स्टीव्ह स्मिथच्या डाव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली आहे. स्मिथ आणि तो दुखापतींसह अॅशेस खेळले होते. स्मिथची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी निवड झाली. एकदिवसीय मालिकेत स्मिथच्या जागी मार्नस लाबुशेनला संधी मिळाली. टी-२० मालिकेत अॅश्टन टर्नला संधी देण्यात आली होती. त्याचबरोबर मिचेल स्टार्कच्या मांडीला दुखापत झाली आहे. स्टार्कच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज गोलंदाज जॉन्सनचा संघात समावेश करण्यात आला. भारत दौऱ्यावर स्मिथ आणि स्टार्क संघात परततील अशी अपेक्षा आहे. एकदिवसीय विश्वचषक फक्त ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे.
ग्लेन मॅक्सवेलबद्दल बोलायचे, तर त्याने आतापर्यंत १२८ एकदिवसीय आणि ९८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये ३३.८८ च्या सरासरीने ३४९० धावा केल्या आहेत, ज्यात २ शतके आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर टी-२० फॉरमॅटमध्ये त्याच्या २१५९ धावा आहेत. क्रिकेटच्या या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये त्याने ३ शतके आणि १० अर्धशतके केली आहेत. त्याने आतापर्यंत ७ कसोटी सामने खेळले आहेत. पण २०१७ पासून तो रेड बॉल फॉरमॅटचा भाग नाही. गेल्या काही काळापासून तो पांढऱ्या चेंडूच्या फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी प्रभावी भूमिका बजावत आहे.