Glenn Maxwell said IPL will be the last tournament of my career : आयपीएल २०२४ च्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळत आहे. फ्रँचायझींनी त्याच्यावर करोडो रुपये खर्च केले आहेत. मॅक्सवेलही या लीगला खूप महत्त्व देतो. त्याच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा ही आयपीएल असेल, असे तो म्हणाला आहे. यासोबतच या खेळाडूने डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल जॉन्सन यांच्यातील वादावरही आपले मत व्यक्त केले.

ग्लेन मॅक्सवेलबद्दल बोलायचे तर तो सध्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा महत्त्वाचा खेळाडू आहे. मागील हंगामातही तो याच संघासोबत होता. यावेळीही तो आरसीबीसोबत आहे. गेल्या मोसमात अनेक सामन्यांमध्ये मॅक्सवेलची कामगिरी चांगली होती. त्यामुळे आगामी मोसमातही तो चमकदार कामगिरी करेल आणि संघाला विजेतेपद मिळवून देईल अशी आशा आहे.

What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Athavale claim chairman of trust running Siddharth college
‘पीपल्स’च्या अध्यक्षपदावर रामदास आठवले यांचा दावा; जुन्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी ५०० कोटींच्या निधीची मागणी
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : सत्ताधाऱ्यांच्या लांगूलचालनाचे उदाहरण
TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”

आयपीएलमुळे खूप काही शिकण्याची संधी मिळाली – ग्लेन मॅक्सवेल

ईएसपीएनशी बोलताना ग्लेन मॅक्सवेल म्हणाला, ‘आयपीएल ही माझ्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल. कारण मी जोपर्यंत चालण्यास सक्षम आहे, तोपर्यंत मी आयपीएल खेळणार आहे. माझ्या कारकिर्दीत ही लीग खूप महत्त्वाची ठरली आहे. मी येथे भेटलेल्या लोकांचा, मी ज्या प्रशिक्षकांसोबत काम केले, ज्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत मी खेळलो त्यांचा मला खूप फायदा झाला.”

हेही वाचा – Team India : रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराहसह ‘या’ पाच भारतीय खेळाडूंचा आज वाढदिवस

ग्लेन मॅक्सवेल पुढे म्हणाला, “आयपीएलमध्ये तुम्ही एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंसोबत दोन महिने खेळता. त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळते. कोणत्याही खेळाडूसाठी ही खूप मोठी शिकण्याची गोष्ट आहे. आशा आहे की आमच्या अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळेल.” ग्लेन मॅक्सवेलने नुकत्याच झालेल्या विश्वचषकात चमकदार कामगिरी करत संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात द्विशतक झळकावले होते.

हेही वाचा – IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून दीपक चहर माघार घेणार? जाणून घ्या काय आहे कारण

डेव्हिड वॉर्नर चॅम्पियन खेळाडू राहिला – ग्लेन मॅक्सवेल

याच प्रसंगी मॅक्सवेलला डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल जॉन्सन यांच्यात सुरू असलेल्या वादाबद्दलही विचारण्यात आले. मॅक्सवेल म्हणाला, “मला याबद्दल बोलून माझे नाव चर्चेत आणायचे नाही, पण डेव्हिड वॉर्नर नेहमीच चॅम्पियन खेळाडू राहिला आहे. तो बराच काळ ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळला आहे आणि निवडकर्त्यांना माहित आहे की त्यांनी वॉर्नरची निवड का केली आहे. त्याला पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळताना पाहण्यासाटी मी खूप उत्सुक आहे. मला आशा आहे की, तो या उन्हाळ्यात खूप धावा करेल.”

Story img Loader