सचिन तेंडुलकरला क्रिकेटविश्वात क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाते. जरी हा क्रिकेटचा देव क्रिकेट विश्वातून निवृत्त झाला असला, तरी त्याच्या चाहत्यांमध्ये अजून ही मास्टर ब्लास्टर क्रेझ आहे. याचाच प्रत्यय आज सकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडीमध्ये आला. येथे आज सकाळी पहाटेच्या काकड आरतीच्या वेळीला सचिन तेंडुलकर उपस्थिती होता. त्याचा दर्शन घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडीमध्ये सचिन तेंडुलकरने पहाटेच्या काकड आरतीच्या वेळी उपस्थित राहणार आहे, याची कोणालाच कल्पना नव्हती. सचिनसह मंदिरात त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही होता. मंदिरातील पूजारी आणि इतरांना तर सोडाच, पण मंदिरातील पुजारींना देखील माहिती नव्हती. त्यामुळए सचिनच्या अचानक उपस्थितमुळे सर्वच आश्चर्यचकित झाले.
दरम्यान, पहाटेची वेळ असताना सुद्धा सचिन तेंडुलकरने आपला नम्रपणा दाखवत रांगेतून दर्शन घेतले. सचिन आणि त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर कोल्हापुरात काल रात्री आले होते. कारण त्यांना आज पहाटेची काकड आरती गाठायची होती. त्यानुसार ते पहाटे ४:४५ वाजता नृसिंहवाडीमध्ये दाखल झाले. कृष्णा-पंचगंगा नदीच्या संगमावर असलेल्या श्री दत्त महाराजाचे दर्शन घेतलं. नवल खोंबारे यांनी सचिनला श्रीफळ प्रसाद दिला.
सचिन तेंडुलकर नृसिंहवाडी येऊन गेल्याची बातमी सचिन गेल्यानंतर वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे नेहमी मंदिर परिसरात असणाऱ्यांनी मंदिराकडे धाव घेतली पण तोपर्यंत सचिन दर्शन घेऊन निघून गेला होता. सचिन तेंडुलकरने दत्त महाराजांचा दर्शन घेतलेला व्हिडीओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.