देशांतर्गत क्रिकेट खेळणारे क्रिकेटपटू सय्यद हैदर अली यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. हैदर यांचे शनिवारी प्रयागराज येथे निधन झाले, त्यांच्या पश्चात सय्यद शेर अली आणि रझा अली अशी दोन मुले आहेत. सर्वोत्तम डावखुरा फिरकीपटू हैदर अली भारताकडून कधीही खेळू शकला नाही. माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू रझा म्हणाला, “काही दिवसांपासून त्यांच्या छातीत दुखत होते. डॉक्टरांची तपासणी करून आम्ही घरी परतत असताना अचानक ते जमिनीवर कोसळले. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.”

माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू रझा यांनी सांगितले की, काही काळापासून त्याच्या छातीत जड होते. तपासणी करून आम्ही घरी परतत असताना अचानक तो कोसळला. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. हैदर अलीने १९६३-६४ हंगामात रेल्वेसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले आणि जवळपास २५ वर्षे खेळला. त्याने ११३ प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये ३६६ विकेट्स घेतल्या ज्यात त्याने तीन वेळा १० विकेट्स घेतल्या आणि २५ वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत.

Virat Kohli poor batting average in 2024
Virat Kohli : विराट कोहलीच्या संपूर्ण कारकिर्दीत जे घडलं नव्हतं, ते २०२४ मध्ये घडलं; नक्की काय झालं? जाणून घ्या
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Ravichandran Ashwin Creates History Breaks Most Wickets Record OF Nathan Lyon in WTC and Becomes First Player IND vs NZ
IND vs NZ: रविचंद्रन अश्विनचा WTC इतिहासात मोठा पराक्रम, नॅथन लायनचा रेकॉर्ड मोडत ठरला नंबर वन गोलंदाज
Sarfaraz Khan becomes father after wife gave birth to baby boy
Sarfaraz Khan : सर्फराझ खान झाला ‘अब्बा’जान! इन्स्टा स्टोरीवर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी
gauri lankesh murder accused removed from shiv sena after eknath shinde steps
गौरी लंकेश हत्येतील आरोपीची शिवसेनेतून हकालपट्टी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कारवाई
Sarfaraz Khan 3rd India batter to Duck and 150-plus score in the same Test for India
Sarfaraz Khan : सर्फराझने पहिल्याच शतकासह घडवला इतिहास, १९९६ नंतर ‘हा’ खास विक्रम नोंदवणारा ठरला पहिलाच भारतीय
David Warner praises Sarfraz Khan after his Maiden Test Century
Sarfaraz Khan : ‘…सूरज अपने ही समय पर निकलेगा’, सर्फराझच्या वडिलांचे शब्द ठरले खरे, डेव्हिड वॉर्नरच्या पोस्टने जिंकली मनं
Sarfaraz Khan Century Record in IND vs NZ 1st test match
Sarfaraz Khan : सर्फराझने पहिले शतक झळकावत केला मोठा पराक्रम, भारतासाठी ‘ही’ खास कामगिरी करणारा ठरला दुसरा फलंदाज

बीसीसीआय पुरस्कारने सन्मानित

हैदर अली यांची पहिल्यांदा १९६३-६४ मध्ये उत्तर प्रदेश रणजी संघात निवड झाली होती. यानंतर त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये रेल्वे संघाचे प्रतिनिधित्व केले. दुलीप ट्रॉफीमध्येही त्यांनी सेंट्रल झोन संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी १९८७-८८ पर्यंत क्रिकेट खेळले होते. प्रथम श्रेणी सामना खेळून बीसीसीआय क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जिंकणारे हैदर अली हे एकमेव खेळाडू आहेत. यावर अनेक माजी खेळाडूंनी शोक व्यक्त केला आहे.