ICC Cricket World Cup 2023, Ticket Booking: क्रिकेटचे महाकुंभ असलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. मात्र, तिकिटं मिळत नसल्याच्या तक्रारी चाहत्यांकडून वारंवार केल्या जात आहेत. भारताच्या सामन्यांच्या तिकिटांचे बुकिंग आता खुद्द बीसीसीआय करणार असल्याने चाहत्यांना मोठी भेट मिळाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) चार लाख नवीन तिकिटे जाहीर करणार आहे. त्यामुळे चाहते लवकरच नवीन तिकिटे बुक करू शकतात. या नवीन तिकिटांचे बुकिंग कधी सुरु होणार याबाबत जाणून घेऊ या.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी जाहीर केले की, ते भारतात आगामी क्रिकेट विश्वचषक २०२३चे सुमारे ४ लाख तिकिटे विकणार आहेत. १२ वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भारताने घेतल्याने तिकिटांची मागणी वाढली आहे. त्यामुळेच विश्वचषकाची सर्व तिकिटे विकल्यानंतर मैदानावरील थेट सामन्याची झलक पाहण्यासाठी आस लावून बसलेल्या अनेक चाहत्यांची निराशा झाली होती. मात्र, बीसीसीआयने स्वतःच हा निर्णय तिकिटे ऑनलाइन विकण्याचा निर्णय घेतला आहे.

icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
restrictions on sale of railway platform tickets lifted from 9 november
Railway Platform Tickets Available : फलाट तिकीट पुन्हा उपलब्ध
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
IND vs SA India National Anthem Witnesses Technical Glitch Ahead Of 1st T20I vs South Africa
IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या
Champions Trophy Cricket Tournament BCCI demand to organize matches in Dubai sport news
पाकिस्तानात खेळण्यास नकारच! दुबईत सामने आयोजित करण्याची ‘बीसीसीआय’ची मागणी

हेही वाचा: Shahid Afridi: “पाकिस्तान सुरक्षित!”, शाहिद आफ्रिदीची जय शाहांवर टीका; म्हणाला, “तुमच्या डोक्यातील विचारांची जळमटं…”

बीसीसीआयने आपल्या अधिकृत वेबसाईटवर म्हटले आहे की, “बीसीसीआयला आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३च्या तिकिटांची प्रचंड मागणी आली आहे. बीसीसीआयने या सामन्याचे आयोजन करणाऱ्या राज्य क्रिकेट संघटनेशी वाटाघाटी केल्यानंतर चार लाख नवीन तिकिटे प्रसिद्ध करण्याची घोषणा केली. अधिकाधिक क्रिकेट चाहत्यांना हे सामने थेट पाहण्याची संधी देण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलत आहोत. जेणेकरून ते या ऐतिहासिक स्पर्धेचा भाग बनू शकतील. चाहत्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर तिकीट बुक करावे.”

हेही वाचा: Gautam Gambhir: “मला क्रिकेटर व्हायचचं नव्हतं…”, गौतम गंभीरने का केलं हे धक्कादायक विधान? जाणून घ्या

पहिल्या टप्प्यात, भारत वगळता सर्व संघांच्या सराव आणि इव्हेंट गेम्सची तिकिटे २८ ऑगस्टपासून विक्रीस सुरू झाली होती. ३० ऑगस्टपासून, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरममध्ये भारताच्या सराव सामन्यांसाठी तिकिटे उपलब्ध करून देण्यात आली होती. एका दिवसानंतर, चेन्नई (वि ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर), दिल्ली (वि. अफगाणिस्तान, ११ ऑक्टोबर) आणि पुणे (वि. बांग्लादेश, १९ ऑक्टोबर) येथे भारताच्या सामन्यांची तिकिटे जाहीर करण्यात आली. १ सप्टेंबरपासून, धरमशाला (वि. न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर), लखनऊ (वि. इंग्लंड, २९ ऑक्टोबर) आणि मुंबई (वि. श्रीलंका, २ नोव्हेंबर) टीम इंडियाच्या सामन्यांची तिकिटे खरेदी करू शकतात.

विश्वचषक सामन्यांची तिकिटे ऑनलाइन कशी बुक करावी?

क्रिकेट चाहते https://tickets.cricketworldcup.com वर ऑनलाइन तिकीट बुक करू शकतात. ही तिकिटे ८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून उपलब्ध होणार आहेत. हे दुसऱ्या टप्प्याचे तिकीट बुकिंग असेल. यानंतर तिसर्‍या टप्प्यासाठी तिकीट बुकिंगसाठी लवकरच सूचना दिली जाईल. विशेष म्हणजे ५ ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. भारतीय संघ आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे होणार आहे. त्याचवेळी, या स्पर्धेचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.