ICC Cricket World Cup 2023, Ticket Booking: क्रिकेटचे महाकुंभ असलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. मात्र, तिकिटं मिळत नसल्याच्या तक्रारी चाहत्यांकडून वारंवार केल्या जात आहेत. भारताच्या सामन्यांच्या तिकिटांचे बुकिंग आता खुद्द बीसीसीआय करणार असल्याने चाहत्यांना मोठी भेट मिळाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) चार लाख नवीन तिकिटे जाहीर करणार आहे. त्यामुळे चाहते लवकरच नवीन तिकिटे बुक करू शकतात. या नवीन तिकिटांचे बुकिंग कधी सुरु होणार याबाबत जाणून घेऊ या.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी जाहीर केले की, ते भारतात आगामी क्रिकेट विश्वचषक २०२३चे सुमारे ४ लाख तिकिटे विकणार आहेत. १२ वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भारताने घेतल्याने तिकिटांची मागणी वाढली आहे. त्यामुळेच विश्वचषकाची सर्व तिकिटे विकल्यानंतर मैदानावरील थेट सामन्याची झलक पाहण्यासाठी आस लावून बसलेल्या अनेक चाहत्यांची निराशा झाली होती. मात्र, बीसीसीआयने स्वतःच हा निर्णय तिकिटे ऑनलाइन विकण्याचा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयने आपल्या अधिकृत वेबसाईटवर म्हटले आहे की, “बीसीसीआयला आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३च्या तिकिटांची प्रचंड मागणी आली आहे. बीसीसीआयने या सामन्याचे आयोजन करणाऱ्या राज्य क्रिकेट संघटनेशी वाटाघाटी केल्यानंतर चार लाख नवीन तिकिटे प्रसिद्ध करण्याची घोषणा केली. अधिकाधिक क्रिकेट चाहत्यांना हे सामने थेट पाहण्याची संधी देण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलत आहोत. जेणेकरून ते या ऐतिहासिक स्पर्धेचा भाग बनू शकतील. चाहत्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर तिकीट बुक करावे.”
पहिल्या टप्प्यात, भारत वगळता सर्व संघांच्या सराव आणि इव्हेंट गेम्सची तिकिटे २८ ऑगस्टपासून विक्रीस सुरू झाली होती. ३० ऑगस्टपासून, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरममध्ये भारताच्या सराव सामन्यांसाठी तिकिटे उपलब्ध करून देण्यात आली होती. एका दिवसानंतर, चेन्नई (वि ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर), दिल्ली (वि. अफगाणिस्तान, ११ ऑक्टोबर) आणि पुणे (वि. बांग्लादेश, १९ ऑक्टोबर) येथे भारताच्या सामन्यांची तिकिटे जाहीर करण्यात आली. १ सप्टेंबरपासून, धरमशाला (वि. न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर), लखनऊ (वि. इंग्लंड, २९ ऑक्टोबर) आणि मुंबई (वि. श्रीलंका, २ नोव्हेंबर) टीम इंडियाच्या सामन्यांची तिकिटे खरेदी करू शकतात.
विश्वचषक सामन्यांची तिकिटे ऑनलाइन कशी बुक करावी?
क्रिकेट चाहते https://tickets.cricketworldcup.com वर ऑनलाइन तिकीट बुक करू शकतात. ही तिकिटे ८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून उपलब्ध होणार आहेत. हे दुसऱ्या टप्प्याचे तिकीट बुकिंग असेल. यानंतर तिसर्या टप्प्यासाठी तिकीट बुकिंगसाठी लवकरच सूचना दिली जाईल. विशेष म्हणजे ५ ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. भारतीय संघ आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे होणार आहे. त्याचवेळी, या स्पर्धेचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.