Yuzvendra Chahal & Dhanashree Karwa Chauth:करवाचौथच्या निमित्ताने बॉलिवूड सेलिब्रिटींचे पारंपरिक रूप पाहायला मिळाले, अगदी कतरिनाचा लाल चूडा भरलेला फोटो ते अंकिता लोखंडे सर्वांनी आपल्या अहोंसह सुंदर फोटो शेअर केले होते. याच निमित्ताने युजवेंद्र चहल व धनश्री वर्माचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक महिन्यांपासून या जोडप्यात फूट पडल्याच्या बातम्यांना आता अखेरीस या व्हिडीओने पूर्णविराम दिला आहे. सध्या टी २० विश्वासचषकासाठी युजवेंद्र चहल ऑस्ट्रेलियात आहे. अशावेळी भारतातून धनश्रीने शेअर केलेला हा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

धनश्रीने काल युजवेंद्रसाठी करवाचौथचे व्रत करून लाडक्या पतीला व त्यांच्या चाहत्यांना गोड सरप्राईझ दिलं. अगदी पारंपरिक पद्धतीने करवाचौथचे व्रत सोडण्यासाठी धनश्रीने युझीला व्हिडीओ कॉल केला होता. अगदी काही सेकंदाची हि क्लिप सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी कमेंट करून तुम्ही नेहमीच एकत्र राहा, एकत्र तुम्ही छान दिसता अशा कमेंट केल्या आहेत. साहजिकच यावर ट्रोलर्सनेही निशाणा साधून आता हि नाटकं बंद करा, अती होतंय असेही लिहिले आहे पण धनश्री- युजवेंद्रने आपल्या सुंदर केमिस्ट्रीने या ट्रोलर्सना उत्तर दिले आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य

धनश्रीने व्हिडीओ शेअर करून यावर इंडिया ते ऑस्ट्रेलियामधील करवाचौथ असं कॅप्शन दिलं आहे.

Video: शुबमन गिल व सारा अली खानचा हॉटेलमधील ‘तो’ क्षण होतोय तुफान Viral, कॅमेरा बघताच दोघांनी…

दरम्यान, टी २० विश्वचषकासाठी युजवेंद्र चहल भारताची भक्कम बाजू ठरू शकतो. एकीकडे जसप्रीत बुमरा, रविंद्र जडेजा, दीपक चहर हे वेगवान गोलंदाज भारतीय संघातून दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत, अशावेळी चहलच्या खांद्यावर टीम इंडियाच्या गोलंदाजीची मोठी जबाबदारी आहे. विश्वचषकात धनश्री ऑस्ट्रेलियात स्टेडियममध्ये दिसणार का आणि धनश्रीला पाहून चहलचा परफॉर्मन्स दमदार होणार का याविषयीही अनेकांनी कमेंटमध्ये विचारणा केली आहे.

Story img Loader