Dilip Sardesai Google Doodle : जगातील सर्वात मोठे सर्ज इंजिन असलेल्या गुगले आज डुडलद्वारे भारतीय कसोटी संघातील क्रिकेटर दिलीप सरदेसाई यांना मानवंदना दिली आहे. त्यांची आज ७८ वी जयंती आहे. ८ ऑगस्ट १९४० रोजी त्यांचा जन्म झाला होता. भारताच्या राष्ट्रीय संघात खेळलेले दिलीप सरदेसाई गोवा राज्यातील एकमेव भारतीय खेळाडू आहेत. सरदेसाई यांचे क्रिकेट करियर मोठे नसले तरी त्यांनी भारतीय संघासाठी मोठे योगदान दिले आहे. दिलीप सरदेसाई यांच्यामुळे भारतीय संघाने परदेशात विजय मिळवण्यास सुरुवात केली. दिलीप सरदेसाई यांच्यामुळे भारताने पहिल्यांदाच वेस्ट इंडिजमध्ये विजय मिळवला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसोटी मालिकेमध्ये सर्वाधिक धावा जमवण्याचा विक्रम दिलीप सरदेसाई यांच्या नावावर होता. १९७० -७१मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्यांनी ६४२ धावा केल्या होत्या. १९६१मध्ये कानपूर कसोटीतून त्यांनी आपल्या कसोटी करियरची सुरुवात केली होती. १९७२ मध्ये दिल्लीमध्ये सरदेसाई यांनी शेवटचा कसोटी सामना खेळला. दोन जुलै २००७ रोजी वयाच्या ६६ व्या वर्षी दिलीप सरदेसाई यांनी अखेरचा श्वास घेतला.

दिलीप सरदेसाई यांनी ३३ कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यामधील ५५ डावांत ३९.२३ च्या सरासरीने २००१ धावा केल्या . यामध्ये पाच शतके आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटीमध्ये सरदेसाई यांची २०१ धावांची सर्वेत्कृष्ट खेळी केली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १७९ सामन्यातील २७१ डावांत सरदेसाई यांनी १०,२३० धावांचा डोंगर उभा केला होता. यादरम्यान त्यांची सरासरी ४१.७५ होती. प्रथम श्रेणीमध्ये सरदेसाई यांच्या नावावर २५ शतके आणि ५६ अर्धशतके आहेत.