उद्यापासून सुरू होत असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेनिमित्त गुगलकडून एक खास डुडल तयार करण्यात आले आहे. या डुडलमध्ये मैदानात क्रिकेटचा सामना सुरू असल्याचे दाखविण्यात आले आहे. खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये क्रिकेटचा हा सामना सुरू आहे. गुगलच्या होमपेजवर झळकत असलेले हे खास डुडल नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहे. या डुडलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ट्वेन्टी विश्वचषकाचे वेळापत्रक आणि संबंधित बातम्या पहायला मिळत आहेत. इंटरनेट महाजालातील लोकप्रीय सर्च इंजिन असलेल्या गुगलकडून विशिष्ट माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तयार करण्यात येणारे डुडल्स नेटिझन्समध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत.

Story img Loader