आयसीसी कसोटी क्रमवारीत १ एप्रिलपर्यंत अव्वल स्थान पटकावल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथने आयसीसी कसोटी अजिंक्यपदाची गदा पटकावण्याचा मान मिळविला. आयसीसीच्या पंच आणि सामनाधिकाऱ्यांचे व्यवस्थापक विन्स व्हॅन डर बिजल यांच्याकडून जोहान्सबर्ग येथे झालेल्या कार्यक्रमात स्मिथने कसोटी अजिंक्यपदाची गदा आणि साडेचार लाख अमेरिकन डॉलर्सचे पारितोषिक स्वीकारले.
२००३मध्ये कसोटी क्रमवारी पद्धतीला सुरुवात झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाने १२८ गुणांसह पहिल्यांदाच अव्वल क्रमांकाचा मुकुट परिधान केला. इंग्लंडला (११४ गुण) दुसऱ्या तर भारताला (११२ गुण) तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
दक्षिण आफ्रिका संघाचे खेळाडू, संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांतर्फे ही गदा स्वीकारताना मला आनंद आणि अभिमान वाटत आहे. दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व सांभाळण्याचा मान मिळणे, ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.
ग्रॅमी स्मिथ, द. आफ्रिकेचा कर्णधार

Story img Loader