England Ex Cricketer Graham Thorpe Died By Suicide: इंग्लंडचा महान फलंदाज ग्रॅहम थॉर्प यांच्या निधनाबाबत मोठा खुलासा झाला आहे. अनेक वर्षे डिप्रेशन आणि नैराश्याशी झुंज दिल्यानंतर इंग्लंडचा महान फलंदाज ग्रॅहम थॉर्प यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांना वाटले की त्यांची मुले आणि पत्नी त्यांच्याशिवाय सुखी राहतील. असा खुलासा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. थॉर्प यांनी मे २०२२ मध्येही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण रविवारी ५ ऑगस्ट रोजी त्यांनी पुन्हा आत्महत्या केली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
थॉर्प यांची पत्नी अमान्डा यांनी अमांडाने टाईम्सला सांगताना म्हटले की, “एक पत्नी आणि दोन मुली असूनही ज्यांच्यावर त्यांचे खूप प्रेम होते आणि ज्यांनी ग्रॅहमलाही जीव लावला, पण तरीही ते बरे झाले नाही. अलीकडच्या काळात ते खूप आजारी होते आणि त्यांना असं वाटत होतं की त्यांच्याशिवाय आम्ही चांगले आणि आनंदी राहू आणि त्यांनी हे मोठे पाऊल उचलले ज्यामुळे आम्हीही कोलमडलो आहोत. थॉर्पची पत्नी अमांडाने टाईम्सला सांगितले. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने ५ ऑगस्ट रोजी ५५व्या वर्षी थॉर्प यांचे निधन झाल्याचे कळवले.
अलीकडच्या काळात ग्रॅहम खूप आजारी होता आणि तिला खरोखरच वाटले की आपण त्याच्याशिवाय बरे होऊ आणि त्याने हे केले आणि त्याने स्वतःचा जीव घेतला याचे आम्हाला खूप दुःख आहे. थोरपे यांनी वयाच्या अवघ्या ५५ व्या वर्षी आत्महत्या केली. आता थॉर्प यांच्या स्मरणार्थ एक फाऊंडेशन सुरू करण्याची त्यांच्या कुटुंबाची योजना आहे.
“गेल्या काही वर्षांपासून, ग्रॅहम नैराश्याने त्रस्त होते. यामुळे मे २०२२ मध्ये त्यांनी स्वतचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामुळे त्यांच्यावर बराच काळ उपचार सुरू होते. ठिक होण्याची आशा असतानाही ते सतत नैराश्याने ग्रस्त होते, काही वेळेस अधिक गंभीर परिस्थिती असायची, आम्ही त्यांना एक कुटुंब म्हणून आधार दिला आणि त्यांनी अनेक उपचार केले परंतु दुर्दैवाने काहीच कामी आलं नाही,” असं त्या म्हणाल्या.
हेही वाचा – VIDEO: “माझी अशी इच्छा आहे की…” मनू भाकेरच्या आईने नीरजचा हात स्वत:च्या डोक्यावर ठेवला अन् चर्चांना आलं उधाण
थॉर्प यांनी १९९३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी पदार्पणात शतक झळकावून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली, त्यापूर्वी २० वर्षात ही कामगिरी करणारा तो पहिला इंग्लिश खेळाडू ठरला. त्यांनी १०० कसोटी सामने खेळले, ४४.७ च्या सरासरीने ६,७४४ धावा केल्या. २००२ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध नाबाद २०० ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. थॉर्पने १९९३ ते २००२ पर्यंत ८२ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) सामने खेळले आणि २,३८० धावा केल्या.