England Cricketer Graham Thorpe Dies at 55: इंग्लंडचा माजी फलंदाज आणि सरेचा महान क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्प यांचे निधन झाले आहे. ग्रॅहम थॉर्प यांनी वयाच्या ५५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. ग्रॅहम थॉर्प यांनी ४ दिवसांपूर्वी १ ऑगस्टला ५५ वा वाढदिवस साजरा केला होता. ग्रॅहम थॉर्प हे एका आजाराने बऱ्याच काळापासून त्रस्त होते. पण त्यांच्या आजाराचा खुलासा झालेला नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोमवारी सरेचा महान फलंदाज ग्रॅहम थॉर्प यांचे निधन झाल्याची माहिती दिली.
ग्रॅहम थॉर्पने इंग्लंडकडून १०० कसोटी सामने खेळले ज्यात त्यांनी ६७४४ धावा केल्या. या डावखुऱ्या फलंदाजाने १६ शतके आणि ३९ अर्धशतके केली आहेत. याशिवाय थॉर्पने इंग्लंडसाठी ८२ एकदिवसीय सामन्यांमध्ये २१ अर्धशतकांसह २३८० धावा केल्या आहेत. थॉर्प हे इंग्लिश काऊंटी संघाचे अनुभवी खेळाडू होते. त्यांनी ३४१ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४९ शतकांच्या मदतीने २१,९३७ धावा केल्या. तसेच, त्यांनी लिस्ट ए मध्ये १०,८७१ धावा केल्या, ज्यात ९ शतके झळकावली. थॉर्पने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत एकूण ५८ शतके झळकावली होती.
Graham Thorpe: फक्त खेळाडूचं नव्हे तर प्रशिक्षकाचीही भूमिका पार पाडली
ग्रॅहम थॉर्प हे केवळ खेळाडूच नव्हे तर प्रशिक्षक म्हणूनही खूप लोकप्रिय होते. थॉर्प यांनी २००५ मध्ये न्यू साउथ वेल्सचे प्रशिक्षकपद भूषवले आणि त्यानंतर त्यांना इंग्लंड लायन्सचे प्रशिक्षक बनवण्यात आले. तरुण खेळाडूंना तयार करणे हे त्यांचे काम होते. २०१३ च्या सुरुवातीस, थॉर्प इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी-२० संघांचे फलंदाजी प्रशिक्षक बनले. २०२० मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान ते संघाचे अंतरिम प्रशिक्षक बनले. २०२२ मध्ये थॉर्प हे अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक बनले, पण हे पद स्वीकारण्यापूर्वीच त्यांना गंभीर आजारानचे निदान झाले.
हेही वाचा – Novak Djokovic: नोव्हाक जोकोव्हिचला सुवर्णपदकाने इतकं भावुक का केलं?
ग्रॅहम थॉर्प सचिन-सेहवागसारख्या दिग्गजांसह क्रिकेटही खेळले आहेत. त्यांनी टीम इंडियाविरुद्ध ५ कसोटीत ३५ पेक्षा जास्त सरासरीने २८३ धावा केल्या. टीम इंडियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात या खेळाडूने ३६ पेक्षा जास्त सरासरीने ३२८ धावा केल्या. टीम इंडिया विरुद्ध या खेळाडूची सरासरी नेहमीच चांगली होती पण त्यांना भारताविरूद्ध कधीच शतक झळकावता आले नाही.