पीटीआय, न्यूयॉर्क
भारताच्या कोनेरू हम्पीने रविवारी इंडोनेशियाच्या इरीन सुकंदरला नमवत ऐतिहासिक दुसऱ्यांदा जागतिक जलद (रॅपिड) बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद मिळवले. हम्पीने २०१९मध्ये जॉर्जिया येथे झालेल्या स्पर्धेतही अजिंक्यपद पटकावले होते. भारताची आघाडीची महिला बुद्धिबळपटू चीनच्या जू वेन्जूननंतर एकहून अधिक जेतेपद मिळवणारी दुसरी बुद्धिबळपटू ठरली. ३७ वर्षीय हम्पीने संभावित ११ पैकी ८.५ गुणांची कमाई केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हम्पीमुळे भारतीय बुद्धिबळासाठी हे वर्ष संस्मरणीय राहिले. याआधी डी. गुकेशने सिंगापूरमध्ये पारंपरिक प्रारूपातील जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत चीनच्या डिंग लिरेनला नमवत जगज्जेतेपद मिळवले. सप्टेंबरमध्ये भारताने बुडापेस्ट येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच खुल्या व महिला गटात सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. हम्पीने जागतिक जलद (रॅपिड) बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत नेहमीच चमकदार कामगिरी केली आहे. तिने २०१२मध्ये मॉस्को येथे कांस्य, तर गेल्या वर्षी उझबेकिस्तानच्या समरकंद येथे रौप्यपदक मिळवले होते. रशियाच्या १८ वर्षीय वोलोडर मुर्जिनने याच प्रारूपातील पुरुष गटाचे जेतेपद मिळवले. नोदिरबेक अब्दुसत्तोरोवनंतर मुर्जिन दुसरा सर्वात युवा ‘फिडे’ जलद प्रारूपातील जगज्जेता आहे. नोदिरबेकने १७व्या वर्षी जेतेपद पटकावले होते.

हेही वाचा : Rahmat Shah : रहमत शाहचे ऐतिहासिक द्विशतक! अफगाणिस्तानसाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

या कामगिरीचे श्रेय हम्पीने आपल्या कुटुंबाला दिले. ती म्हणाली,‘‘माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच ही कामगिरी शक्य झाली. जेव्हा मी स्पर्धेसाठी प्रवास करते तेव्हा माझे आई-वडील मुलीची काळजी घेतात. ३७व्या वर्षी जगज्जेतेपद मिळवणे सोपे नाही. जेव्हा तुमचे वय वाढत असते, तेव्हा लक्ष केंद्रित करणेही महत्त्वाचे असते. मी हे करू शकले यात समाधान आहे. पहिल्या फेरीतील पराभवानंतर हम्पी जेतेपदाचा विचार करत नव्हती. सलग चार फेऱ्या जिंकल्यानंतर मला खऱ्या अर्थाने मदत मिळाली.’’

हम्पीला भारत व अमेरिकेदरम्यान असलेल्या वेळेच्या मोठ्या फरकाने खेळाबाहेरही काही आव्हानांचा सामना करावा लागला.‘‘ वेळेच्या फरकामुळे काही गोष्टींचे आव्हान होते. मला येथे पुरेशी झोप मिळत नव्हती. त्यामुळे खेळणे सोपे नव्हते. त्यामुळे सर्वोत्तम कामगिरी केल्याने मी आनंदी आहे,’’ असे हम्पीने सांगितले. आपल्या जेतेपदामुळे अन्य भारतीयांना बुद्धिबळ खेळण्याची प्रेरणा मिळेल असे हम्पीला वाटते, ती म्हणाली,‘‘ भारतासाठी ही योग्य वेळ आहे. आपल्याकडे जगज्जेता म्हणून गुकेश आहे. आता मला जलद प्रारूपात दुसरे जेतेपद मिळाले आहे. त्यामुळे अनेक युवा व्यावसायिक बुद्धिबळ खेळण्यास प्रेरित होतील, असे मला वाटते.’’

हेही वाचा : SA vs PAK : दक्षिण आफ्रिका WTC फायनलमध्ये; रबाडा-यान्सनच्या निर्णायक भागीदारीसह सेंच्युरियन कसोटीवर कब्जा

जेतेपद मिळवल्याने आनंदित आहे. जेव्हा जिंकले तेव्हा मला मध्यस्थाने मी विजेती झाल्याचे सांगितले. ही कामगिरी माझ्यासाठी आश्चर्यकारक होती. कारण, पूर्ण वर्ष मी संघर्ष केला आहे. अनेक स्पर्धांमधील माझी कामगिरी निराशाजनक होती.

कोनेरू हम्पी, जलद बुद्धिबळ प्रारूपातील महिला जगज्जेती.