टी-२० विश्वचषकातील भारताविरुद्धच्या सामन्याआधी, पाकिस्तान संघाला धक्का बसला आहे. पाकिस्तानचे हाय परफॉर्मन्स कोचिंग चीफ ग्रँट ब्रॅडबर्न यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यूझीलंडचे माजी कसोटीपटू ब्रॅडबर्न ३ वर्षे पीसीबीशी संबंधित होते. ते सप्टेंबर २०१८ ते जून २०२० पर्यंत पाकिस्तान क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकही होते.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात ब्रॅडबर्न म्हणाले, ”पाकिस्तान क्रिकेटसोबत काम करणे ही अभिमानाची बाब आहे. मी छान आठवणी आणि अद्भुत अनुभव घेऊन निघतोय. मला शिकण्याची उत्तम संधी दिल्याबद्दल मी पीसीबीचे आभार मानतो.” रमीझ राजा यांनी पीसीबीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ब्रँडबर्न हे पद सोडणारे पाचवे सर्वोच्च अधिकारी आहेत. त्याच्या आधी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक, गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस, मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान आणि मार्केटिंग प्रमुख बाबर हमीद यांनी राजीनामा दिला आहे.
हेही वाचा – “हे बघ माझ्याकडे खूप विकेटकिपर आहेत,” वर्ल्डकपआधी कोहलीचं बोलणं ऐकून ऋषभ पंतने लावला डोक्याला हात
५५ वर्षीय ब्रॅडबर्न म्हणाले, ”करोना प्रोटोकॉलमुळे मी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकलो नाही. माझी पत्नी मारी आणि तीन मुलांनीही मला पाकिस्तान क्रिकेटची सेवा करण्याची परवानगी देऊन खूप त्याग केला आहे. करोनाच्या नियमांमुळे त्याला पाकिस्तानला भेट देणे आणि या देशाची कळकळ, प्रेम आणि मैत्री अनुभवणे आव्हानात्मक बनले. आता माझ्यासाठी माझ्या कुटुंबाला प्राधान्य देण्याची आणि पुढील आव्हानाकडे जाण्याची वेळ आली आहे.”
कारकीर्द
ब्रॅडबर्न फिरकीपटू होते. त्यांनी न्यूझीलंडसाठी १९९० ते २००१ पर्यंत सात कसोटी आणि ११ एकदिवसीय सामने खेळले. ब्रॅडबर्न न्यूझीलंड-अ आणि न्यूझीलंड अंडर-१९ संघांचे प्रशिक्षकही होते.