दुखापतींच्या समस्यांनी घेरलेले कोलंबिया आणि ग्रीस सलामीच्या लढतीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. गोल करण्याची अद्भुत क्षमता असणारा रादामेल फलकाव गुडघ्याच्या दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याने कोलंबिया संघव्यवस्थापनाच्या चिंता वाढल्या आहेत. पात्रता फेरीत कोलंबियातर्फे फलकावने सर्वाधिक गोल केले होते. फलकावनेच्या अनुपस्थितीत टिओफिलो ग्युटेरेझ वर कोलंबियाची भिस्त असणार आहे. जेम्स रॉड्रिग्ज मध्यरक्षणातला महत्त्वाचा दुवा आहे. विश्वचषकातला हा सगळ्यात संतुलित गट आहे. आधीच्या विश्वचषकांच्या तुलनेत आमची तयारी चांगली झाली आहे असे कोलंबियाचे प्रशिक्षक मार्टिनेझ यांनी सांगितले. कोस्टास मिट्रोग्लोयू हा ग्रीससाठी महत्त्वाचा आहे. अनुभवी जॉर्जिओस कारागौनिसकडून ग्रीसला मोठय़ा अपेक्षा आहेत. बादफेरी गाठणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही आतापर्यंत बाद फेरी गाठलेली नाही. त्यामुळे प्राथमिक फेरीत चांगला खेळ करत बाद फेरी गाठण्यावर आमचा भर आहे असे कारागौनिसने सांगितले.
‘क’ गट : कोलंबिया वि. ग्रीस
स्थळ :  इस्टाडिओ मिनिरिओ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा